Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाळंतीणीसाठी सकाळच्या नाश्त्यात पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा बाजरीच्या पिठाची पेज, पौष्टिक पदार्थाने करा दिवसाची सुरुवात

सकाळच्या नाश्त्यात बाजरीच्या पिठापासून बनवलेली पेज खाल्ल्यास शरीराला भरमसाट फायदे होतील. याशिवाय बाळंतीणीच्या आरोग्यासाठी बाजरीच्या पिठाची पेज गुणकारी ठरते. नोट करून घ्या रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 22, 2025 | 08:00 AM
बाळंतीणीसाठी सकाळच्या नाश्त्यात पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा बाजरीच्या पिठाची पेज

बाळंतीणीसाठी सकाळच्या नाश्त्यात पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा बाजरीच्या पिठाची पेज

Follow Us
Follow Us:

महाराष्ट्रात बनवले जाणारे पारंपरिक पौष्टिक पदार्थ चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा अतिशय गुणकारी आहेत. त्यातील अतिशय पौष्टिक धान्य म्हणजे बाजरी. जेवणातील पदार्थांमध्ये बाजरीची भाकरी किंवा मिक्स धान्यांची भाजी कायमच खाल्ली जाते. बाजरीचे सेवन केल्यामुळे शरीराला तात्काळ ऊर्जा मिळते. यामध्ये झिंक, लोह, अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर मोठ्या प्रमाणावर आढळून येते. यामुळे पचन सुधारते, वजन नियंत्रणात राहते, रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल कमी होते आणि उच्च रक्तदाबाच्या समस्येपासून आराम मिळतो. बाजरीपासून बनवलेले पदार्थ लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खायला द्यावेत. बाळंतीणीसाठी बाजरी हा पदार्थ गुणकारी आहे. आज आम्ही तुम्हाला बाजरीच्या पिठाचा वापर करून पेज बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. भूक लागल्यानंतर इतर कोणतेही तेलकट किंवा तिखट पदार्थ खाण्याऐवजी बाजरीच्या पिठाची पेज बनवून प्यावी. यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही. विविध राज्यांमध्ये बाजरीच्या पेजला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. चला तर जाणून घेऊया रेसिपी. (फोटो सौजन्य – istock)

Food Recipe: जिभेवर ठेवताच विरघळून जाईल शाही चवीचा ‘कॅरॅमल शिरा’, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी

साहित्य:

  • बाजरीचे पीठ
  • तूप
  • पाणी
  • मीठ
  • जिरं पावडर
  • गूळ पावडर
पौष्टिकतेने समृद्ध असलेल्या कच्च्या केळींपासून पारंपरिक पद्धतीत बनवा चविष्ट भाजी, वजन राहील नियंत्रणात

कृती:

  • बाजरीच्या पिठाची पेज बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये चमचाभर तूप घालून गरम करा. त्यानंतर त्यात बाजरीचे पीठ घालून मंद आचेवर भाजा.
  • पीठ हलकेसे लाल झाल्यानंतर त्यात पाणी घालून सतत चमच्याने मिक्स करत राहा. यामुळे पिठात अजिबात गुठळ्या होणार नाहीत.
  • पेज शिजल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ, जिऱ्याची पावडर घालून मिक्स करा. बाजरीचे पीठ हळूहळू घट्ट होईल.
  • शिजलेल्या पेजमध्ये सगळ्यात शेवटी गूळ घालून व्यवस्थित मिक्स करा. २ ते ३ मिनिटं शिजल्यानंतर गॅस बंद करून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली बाजरीची पौष्टिक पेज.

Web Title: How to make millet flour pej at home simple food recipe benefits of millet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 22, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

घरी आलेल्या पाहुण्याच्या स्वगतासाठी बनवा मऊ, लुसलुशीत तोंडात विरघळणारे रताळ्याचे गुलाबजाम, नोट करुन घ्या रेसिपी
1

घरी आलेल्या पाहुण्याच्या स्वगतासाठी बनवा मऊ, लुसलुशीत तोंडात विरघळणारे रताळ्याचे गुलाबजाम, नोट करुन घ्या रेसिपी

१० मिनिटांमध्ये बनवा महागड्या हॉटेलमध्ये मिळणारे Lemon Coriander Soup, थंड वातावरणात घ्या पौष्टिक पदार्थ खाण्याचा आनंद
2

१० मिनिटांमध्ये बनवा महागड्या हॉटेलमध्ये मिळणारे Lemon Coriander Soup, थंड वातावरणात घ्या पौष्टिक पदार्थ खाण्याचा आनंद

गोड पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी टेस्टी क्रिमी मखाणा खीर, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने
3

गोड पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी टेस्टी क्रिमी मखाणा खीर, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने

Traditional Food: पावसाळ्यात बनवा गरमागरम पारंपरिक पद्धतीमध्ये कुरडईची भाजी, विकतच्या नूडल्सपेक्षा चव लागेल भारी
4

Traditional Food: पावसाळ्यात बनवा गरमागरम पारंपरिक पद्धतीमध्ये कुरडईची भाजी, विकतच्या नूडल्सपेक्षा चव लागेल भारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.