पौष्टिकतेने समृद्ध असलेल्या कच्च्या केळींपासून पारंपरिक पद्धतीत बनवा चविष्ट भाजी
सकाळच्या नाश्त्यात नियमित दोन केळी खाण्याचा सल्ला कायमच दिला जातो. केळी खाल्ल्यामुळे शरीराला भरपूर फायदे होतात. पिकलेल्या केळींप्रमाणे कच्ची केळीसुद्धा आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. अनेक लोक कच्ची केळी शिजवून तर काही कच्च्या केळींपासून वेगवेगळे पदार्थ बनवून खातात. कोकणातील प्रत्येक घरात कच्ची केळी आणल्यानंतर भाजी बनवली जाते. हिरव्या मिरचीचा वापर करून बनवलेली चविष्ट भाजी उपवासाच्या दिवशी सुद्धा खाल्ली जाते. बऱ्याचदा घरात भाजी काय बनवावी सुचत नाही. नेहमीच्या त्याच ठराविक भाज्या खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्यास हवा असतो. अशावेळी तुम्ही पारंपरिक पद्धतीमध्ये कच्ची केळींपासून भाजी बनवू शकता. कच्च्या केळ्यामध्ये पोटॅशियम, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात आढळतात. ज्यामुळे वाढलेले वजन नियंत्रणात राहते आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. कच्ची केळी आणल्यानंतर ती थेट खाऊ नये. भाजी किंवा कोणताही पदार्थ बनवून खावा. कच्च्या केळ्यांमध्ये असलेले चीक तोंडाला लागल्यानंतर दात आणि एलर्जी होण्याची शक्यता असते. चला तर जाणून घेऊया कच्च्या केळ्यांची भाजी बनवण्याची सोपी रेसिपी. (फोटो सौजन्य – istock)






