Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळच्या नाश्त्यात १५ मिनिटांमध्ये बनवा कुरकुरीत हेल्दी मिश्र भाज्यांचा पराठा, घरातील सगळेच आवडीने खातील

लहान मुलं काही ठराविक भाज्यांचे सेवन करतात. मात्र आहारात सर्व भाज्यांचे सेवन केल्यास शरीराला पोषण मिळेल. आज आम्ही तुम्हाला मिश्र भाज्यांचा पराठा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: May 19, 2025 | 10:31 AM
१५ मिनिटांमध्ये बनवा कुरकुरीत हेल्दी मिश्र भाज्यांचा पराठा

१५ मिनिटांमध्ये बनवा कुरकुरीत हेल्दी मिश्र भाज्यांचा पराठा

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात नेहमीच काय खावं? असे अनेक प्रश्न सगळ्यांचं पडतात. नाश्त्यामध्ये कांदापोहे, उपमा, शिरा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी तुम्ही झटपट मिक्स भाज्यांचा पराठा बनवू शकता. अजूनही अनेक घरांमध्ये लहान मुलांसह मोठेसुद्धा भाज्या खाण्यास नकार देतात. पण भाज्या खाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. भाज्यांचे सेवन केल्यामुळे शरीराला कॅल्शियम आणि विटामिन मिळतात. त्यामुळे रोजच्या आहारात वेगवेगळ्या भाज्यांचे नियमित सेवन करावे. भाज्यांचे सेवन नियमित केल्यास शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसून येतील. पराठा बनवताना तुमच्या आवडीच्या किंवा इतर वेगवेगळ्या भाज्यांचा वापर तुम्ही करू शकता. चला तर जाणून घेऊया मिश्र भाज्यांचा पराठा बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य – iStock)

रताळी खायला आवडत नाहीत? मग सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा रताळ्याचे गोड काप, उपवासासाठी चविष्ट पदार्थ

साहित्य:

  • कोबी
  • कांदा
  • हिरवी मिरची
  • लसूण
  • कोथिंबीर
  • लाल तिखट
  • चाट मसाला
  • धणे पावडर
  • तांदळाचे पीठ
  • पाणी
  • चिली फेलेक्स
पिठलं बनवताना पिठाच्या गाठी होतात? मग ‘या’ पारंपारिक पद्धतीचा वापर करून झटपट बनवा झणझणीत पिठलं

कृती:

  • मिश्र भाज्यांचा पराठा बनवण्यासाठी सर्वप्रथम, तुमच्या आवडीच्या सर्व भाज्या व्यवस्थित धुवून घ्या. त्यानंतर भाज्या बारीक किसून घ्या.
  • मोठ्या बाऊलमध्ये किसून घेतलेला कोबी, कांदा टोमॅटो, बारीक चिरून घेतलेली लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ, लाल तिखट, चाट मसाला आणि चिली फ्लेक्स घालून मिक्स करा.
  • सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्यात तांदळाचे पीठ टाकून मिक्स करा. पीठ तयार करताना त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून घट्टसर मिश्रण बनवा.
  • पॅनमध्ये तेल गरम करून त्यावर गोलाकार मिश्रण टाकून दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला मिश्र भाज्यांचा पराठा. हा पराठा दही किंवा सॉस सोबत चविष्ट लागेल.

Web Title: How to make mix vegetable paratha at home simple breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2025 | 10:31 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Monsoon Recipe : पावसाळ्यात आजारांपासून दूर राहायचंय? मग घरी नक्की बनवा हा आयुर्वेदिक काढा
1

Monsoon Recipe : पावसाळ्यात आजारांपासून दूर राहायचंय? मग घरी नक्की बनवा हा आयुर्वेदिक काढा

जेवणात तोंडी लावण्यासाठी अस्सल गावरान पद्धतीने बनवा झणझणीत गवारचा ठेचा, गवार न आवडणारेसुद्धा खातील आवडीने
2

जेवणात तोंडी लावण्यासाठी अस्सल गावरान पद्धतीने बनवा झणझणीत गवारचा ठेचा, गवार न आवडणारेसुद्धा खातील आवडीने

Recipe: उरलेल्या शिळ्या भाताला फेकताय? ही चूक करू नका, यापासून झटपट बनवा कुरकुरीत ‘राईस पकोडे’
3

Recipe: उरलेल्या शिळ्या भाताला फेकताय? ही चूक करू नका, यापासून झटपट बनवा कुरकुरीत ‘राईस पकोडे’

पावसाळ्यात चहासोबत खाण्यासाठी बनवा कुरकुरीत मसाला कॉर्न चीज कटलेट, नोट करून घ्या सोपी रेसिपी
4

पावसाळ्यात चहासोबत खाण्यासाठी बनवा कुरकुरीत मसाला कॉर्न चीज कटलेट, नोट करून घ्या सोपी रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.