पारंपारिक पद्धतीचा वापर करून झटपट बनवा झणझणीत पिठलं
पिठलं भाकरी हा पारंपरिक पदार्थ लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप आवडतो. जेवणाच्या ताटात जर भाजी नसेल तर ५ मिनिटांमध्ये पिठलं बनवलं जात. पिठलची चव सगळ्यांचं फार आवडते. ऑफिसच्या डब्यात किंवा इतर वेळी घरात भाजी उपलब्ध नसेल तर तुम्ही पिठलं आणि भाकरी खाऊ शकता. मात्र अनेकदा पिठलं बनवताना पिठाच्या गुठळ्या होऊन जातात. पिठाच्या गुठळ्या झाल्यानंतर पिठाची चव चांगली लागत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये झटपट पिठलं बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले पिठलं चवील अतिशय सुंदर लागते. बेसनाच्या पिठाचा वापर करून बनवलेले पिठलं तुम्ही भाकरी किंवा चपातीसोबत खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया पिठलं बनवण्याची सोपी रेसिपी. या पद्धतीमध्ये पिठलं बनवल्यास पिठात गुठळ्या होणार नाहीत.(फोटो सौजन्य – iStock)
वर्षभर टिकणारे लसूण लोणचं सोप्या पद्धतीमध्ये घरीच बनवा, भाकरी चपातीसोबत लागेल चविष्ट