चपातीसोबत भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर सोप्या पद्धतीमध्ये बनवा ‘मिक्स फ्रूट जाम’
लहान मुलं शाळेच्या डब्यात नेहमीच चपाती भाजी किंवा पराठा घेऊन जातात. डब्यात भेंडी, बटाटा, शिमला मिरची किंवा तोंडलीची भाजी खाऊन कंटाळा आल्यानंतर बाहेरील विकतचे पदार्थ खाण्यास मागतात. पण नेहमीच तिखट किंवा तेलकट पदार्थ खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. अशावेळी तुम्ही चपातीसोबत खाण्यासाठी मिक्स फळांचा जाम बनवू शकता. चवीला गोड असलेला जाम लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडतो. जामचे नाव ऐकल्यानंतर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. जाम खाण्याची इच्छा झाल्यानंतर बाजारातून विकत आणलेला जाम आणून खाल्ला जातो. मात्र विकतचा जाम खाण्याऐवजी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये फळांपासून बनवलेला जाम खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया मिक्स फ्रुट जाम बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा High protein egg sandwich, नोट करून घ्या सोपी रेसिपी
डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा पौष्टिक गाजर सूप, नोट करून घ्या रेसिपी