डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा पौष्टिक गाजर सूप
कोरोना नंतरच्या काळात सर्वच गोष्टी डिजिटल झाल्या आहेत. यामुळे मोबाईल फोन, कम्प्युटर, लॅपटॉप इत्यादी अनेक गोष्टींचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. वारंवार मोबाईल वापरल्यामुळे डोळ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. डोळे लाल होणे, डोळ्यांमधून पाणी येणे, डोळे खुपणे किंवा डोळ्यांसंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. अशावेळी तुम्ही रोजच्या आहारात गाजरचे सेवन करू शकता. गाजर खाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. यामध्ये आढळून येणारे घटक आरोग्यासह डोळ्यांसाठी सुद्धा प्रभावी ठरतात. त्यामुळे रोजच्या आहारात नियमित गाजर, काकडी इत्यादी कच्च्या भाज्यांचे सेवन करावे. पण लहान मुलांसह मोठ्यांना गाजर खायला आवडत नाही. अशावेळी तुम्ही मुलांसाठी गाजर सूप बनवू शकता. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी गाजर सूप बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया गाजर सूप बनवण्याची रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
१० मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यात ‘या’ पद्धतीने बनवा बटाट्याचा किस, नोट करून घ्या रेसिपी
सर्दी खोकला होईल कमी! पावसाळ्यात झटपट घरी बनवा क्रिम गार्लिक मशरूम सूप, नोट करून घ्या रेसिपी