Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

घरबसल्या बनवा थायलंडमध्ये मिळणारे थंडगार गुलाबी ड्रिंक, उन्हाळ्यात बनवा आगळीवेगळी रेसिपी

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात लिची मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. त्यामुळे तुम्ही लिचीपासून थायलंडमध्ये मिळणारे थंडगार पेय बनवू शकता. हे पेय कमीत कमी साहित्यामध्ये झटपट तयार होते.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 10, 2025 | 10:42 AM
घरबसल्या बनवा थायलंडमध्ये मिळणारे थंडगार गुलाबी ड्रिंक

घरबसल्या बनवा थायलंडमध्ये मिळणारे थंडगार गुलाबी ड्रिंक

Follow Us
Follow Us:

उन्हाळा ऋतूमध्ये थंड पदार्थांचे सेवन मोठ्या प्रमाणात केले जाते. थंड पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. याशिवाय शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी थंड पदार्थांसोबतच शरीराला पचन होणाऱ्या पदार्थांचे नियमित सेवन करावे. थंड पदार्थ खाण्याची इच्छा किंवा पिण्याची इच्छा झाल्यानंतर ताक, दही, लस्सी, सरबत, कोकम सरबत इत्यादी पदार्थांचे सेवन केले जाते. मात्र नेहमीच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही थायलंडमध्ये बनवलेले जाणारे मोगू-मोगू पेय घरच्या घरी बनवू शकता. थायलंडमध्ये हे पेय अतिशय महाग आहे. याशिवाय जगप्रसिद्ध पेयांची चव घेण्यासाठी अनेक लोक थायलंडमध्ये जातात. या पेयांमध्ये नारळाच्या जेलीसारखा पदार्थ असतो. या पदार्थाची चव अतिशय सुंदर लागते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला घरबसल्या थायलंडमध्ये बनवले जाणारे मोगू-मोगू पेय बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. या पेयांचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतील.(फोटो सौजन्य – iStock)

वाढत्या उष्णतेमुळे पोटात सतत आग होते? आहारात ‘या’ पदार्थांचे चुकूनही करू नका सेवन, वाढतील पोटासंबंधित समस्या

साहित्य:

  • नारळ पाणी
  • लिची
  • आगरआगर
  • साखर
  • लिंबाचे तुकडे
  • बीटचा रस
‘या’ व्यक्तींनी चुकूनही करू नका कलिंगडचे सेवन! पोटातील आतड्यांमध्ये तयार होईल विष, वाढेल इन्फेक्शनचा धोका

कृती:

  • थायलंडचे प्रसिद्ध पेय बनवण्यासाठी सर्वप्रथम, बाजारातून आगरआगर विकत घ्यावे. हा पदार्थ बाजारात सहज उपलब्ध होतो. याशिवाय जेली बनवण्यासाठी या पदार्थाचा वापर केला जातो.
  • नारळ पाणी टोपात घेऊन त्यात आगरआगर टाकून मिक्स करून घ्या. पाण्याला एक उकळी आल्यानंतर गॅस बंद करा.
  • त्यानंतर तयार करून घेतलेले पाणी ताटात ओतून काहीवेळा ठेवा. त्यानंतर त्याची जेली तयार होईल.
  • मिक्सरच्या भांड्यात बीटचे तुकडे टाकून रस करून घ्या. तयार केलेला रस गाळून घ्या.
  • नंतर त्याच मिक्सरच्या भांड्यात लिची टाकून आवश्यकतेनुसार पाणी घालून मिक्सरमधून फिरवून घ्या.
  • तयार केलेल्या लिचीच्या मिश्रणात बीटचा रस आणि लिंबाचा रस टाकून मिक्स करून घ्या.
  • काचेच्या ग्लासात तयार केलेली जेली घालूननंतर त्यात लिचीच्या ज्युस घालून मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला थायलंडचा मोगू-मोगू ज्युस.

Web Title: How to make mogu mogu drink at home summer care tips summer heat lichi drinks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2025 | 10:40 AM

Topics:  

  • easy food recipes
  • food recipe
  • summer drink

संबंधित बातम्या

Food Recipe: १० मिनिटांमध्ये घरच्या घरी बनवा ढाबास्टाईल कुरकुरीत चना कोळीवडा, संध्याकाळच्या भुकेसाठी टेस्टी पदार्थ
1

Food Recipe: १० मिनिटांमध्ये घरच्या घरी बनवा ढाबास्टाईल कुरकुरीत चना कोळीवडा, संध्याकाळच्या भुकेसाठी टेस्टी पदार्थ

Cripsy Jalebi Recipe : ही रेसिपी फाॅलो करा आणि अशाप्रकारे बनवा हलवाई स्टाईल ‘कुरकुरीत गोड जलेबी’
2

Cripsy Jalebi Recipe : ही रेसिपी फाॅलो करा आणि अशाप्रकारे बनवा हलवाई स्टाईल ‘कुरकुरीत गोड जलेबी’

Rajasthani Traditional Food: पारंपरिक गावरान पदार्थ! बाजरीच्या भाकरीसोबत खाण्यासाठी बनवा झणझणीत राजस्थानी लसूण-मिरची चटणी
3

Rajasthani Traditional Food: पारंपरिक गावरान पदार्थ! बाजरीच्या भाकरीसोबत खाण्यासाठी बनवा झणझणीत राजस्थानी लसूण-मिरची चटणी

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट
4

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.