नाचोज चाट बनवण्याची सोपी रेसिपी
लहान मुलांना संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यानंतर खायला काय द्यावे? असा प्रश्न पालकांना पडतो. अनेकदा मुलं बाहेरचे तेलकट पदार्थ खाण्याचा हट्ट करतात. पण सतत तेलकट किंवा तिखट पदार्थ खाल्यामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. लहान मुलांना कमीत कमी बाहेरच्या पदार्थांचे सेवन करण्यास द्यावे, जेणेकरून त्यांचे आरोग्य निरोगी राहतील. सतत बाहेरच्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया बिघडून जाते. पोट दुखी किंवा इतर समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे लहान मुलांना सतत बाहेरचे पदार्थ खाण्यास देऊ नये. लहान मुलांच्या आरोग्यासाठी पौष्टिक असलेले आणि पचनास हलके असलेल्या पदार्थांचे सेवन करण्यास द्यावे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कुरकुरीत नाचोस चाट बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हे नाचोज चाट बनवण्यासाठी फार कमी वेळ लागतो. घाईगडबडीमध्ये असल्यानंतर तुम्ही मुलांना हा पदार्थ बनवून देऊ शकता. चला तर जाणून घेऊया नाचोज चाट बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: चहा पिण्याने होतोय त्रास, तर 20 मिनिट्स आधी खा असे बदाम






