सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला मिश्र कडधान्यांचा ढोकळा
जगभरात मधुमेह या गंभीर आजाराने त्रस्त असलेले अनेक रुग्ण आहेत. मधुमेह झाल्यानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढत जाते आणि आरोग्यासंबंधित इतरही समस्या उद्भवतात. मधुमेह झाल्यानंतर कायमचे गोळ्या औषधांवर जीवन काढावे लागते. अशी गंभीर परिस्थिती येऊ नये आधीच आरोग्याची योग्य ती काळजी घेऊन जीवन जगणे. खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये सतत होणाऱ्या बदलांमुळे आणि चुकीची जीवनशैली जगल्यामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे नेहमी पौष्टिक आणि शरीराला पचन होईल अशा अन्नपदार्थांचे सेवन करावे. हल्लीच्या तरुण पिढीलासुद्धा मधुमेहासारख्या गंभीर आजार होत आहे.
मधुमेह झाल्यानंतर जेवणातील पदार्थांमध्ये पथ्य पाळावे लागते. मधुमेहाचे रुग्ण जास्त प्रमाणात गोड पदार्थांचे सेवन करू शकत नाहीत. असे केल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू लागते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर नाश्त्यामध्ये किंवा इतर वेळी नेमकं काय खावं? असा प्रश्न पडतो. अशावेळी तुम्ही नाश्ता मिश्र कडधान्यांपासून ढोकळा बनवू शकता. हा ढोकळा बनवण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. मिश्र कडधान्यांच्या ढोकळ्याचे सेवन केल्यामुळे आरोग्याला सुद्धा फायदे होतात.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: हळदीचे दूध पिण्याची योग्य वेळ
हे देखील वाचा: Recipe: हॉटेलसारखी परफेक्ट पावभाजी घरी कशी बनवावी? जाणून घ्या सोपी पद्धत