आलू पराठा खाऊन कंटाळा आला असेल तर सोप्या पद्धतीमध्ये बनवा कांद्याचा चविष्ट पराठा
सकाळच्या नाश्त्यात नेहमी नेहमी काय बनवावं? हा प्रश्न सर्वच महिलांना पडतो. अशावेळी इडली, डोसा, कांदापोहे किंवा शिरा, उपमा खाऊन कंटाळा येतो. नेहमीच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी बऱ्याचदा पराठा बनवला जातो. बटाट्याचा पराठा, कोबीचा पराठा इत्यादी अनेक वेगवेगळ्या भाज्यांचा वापर करून पराठा बनवला जातो. मात्र आज आम्ही तुम्हाला कांद्याचा कुरकुरीत पराठा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. तुम्ही बनवलेला कांद्याचा पराठा लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. आपल्यातील अनेकांना कांदा खायला आवडत नाही, अशावेळी तुम्ही कांद्यापासून बनवलेला पराठा किंवा इतर पदार्थ घरी बनवू शकता. चला तर जाणून घेऊया कांद्याचा पराठा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
पोटाला थंडावा देण्यासाठी घरी बनवा सातूच्या पीठाचे थंडगार ताक! शरीरारात कायम टिकून राहील ऊर्जा
यंदाच्या विकेंडला घरी बनवा कोल्हापूर स्टाईल सुक्कं मटण; पाहता क्षणीच तोंडाला पाणी सुटेल