
जिभेवर कायमच चव राहील रेंगाळत! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा लालसर झणझणीत कांद्याचा ठेचा
झणझणीत चवीचा ठेचा हा पारंपरिक पदार्थ आहे. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं हिरवी मिरची आणि शेंगदाण्यांपासून बनवलेला ठेचा खायला खूप जास्त आवडतो. गरमागरम भाकरीसोबत किंवा चपातीसोबत तुम्ही ठेचा खाऊ शकता. बऱ्याचदा रात्रीच्या किंवा सकाळच्या जेवणात भाजी बनवण्याचा कंटाळा आल्यानंतर नेमकं काय बनवावं सुचत नाही? अशावेळी तुम्ही झटपट कांद्याच्या ठेचा बनवू शकता. कांद्याच्या ठेचा बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाहीत. कमीत कमी साहित्यात झटपट तयार होणारे पदार्थ बनवायला बनवायला सगळ्यांचं खूप जास्त आवडते. लहान मुलं कांदा खाण्यास कायमच नकार देतात. भाजीत किंवा इतर कोणत्याही पदार्थांमध्ये कांदा टाकल्यास तो बाहेर काढून टाकला जातो. कांद्याच्या सेवनामुळे भरमसाट फायदे होतात. ठेचा बनवताना हिरव्या मिरच्यांचा वापर करण्याऐवजी लाल सुक्या मिरच्यांचा वापर करावा. यामुळे ठेचला एक वेगळीच चव येते. याशिवाय कांद्याचा ठेचान आठवडाभर व्यवस्थित टिकून राहतो. चला तर जाणून घेऊया झणझणीत कांद्याचा ठेचा बनवण्याची सोपी रेसिपी. (फोटो सौजन्य – istock)