
रात्रीच्या जेवणात हिरव्यागार पालकपासून १० मिनिटांमध्ये बनवा खमंग कुरकुरीत भजी
थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात पालेभाज्या मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. पालकमध्ये अनेक गुणकारी घटक आढळून येतात, ज्यामुळे शरीरात कधीच लोहाची कमतरता जाणवत नाही. शरीरात निर्माण झालेली रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी पालक खाण्याचा सल्ला दिला जातो. पण लहान मुलांना पालक खायला अजिबात आवडत नाही. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये पालकपासून भजी बनवू शकता. कुरकुरीत खमंग भजी चवीला अतिशय सुंदर लागते. थंडगार वातावरणात प्रत्येकालाच काहींना काही गरमागरम पदार्थ खाण्याची इच्छा होते. कायमच बाजारात विकत मिळणारे पदार्थ खाण्यापेक्षा घरी बनवलेल्या पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे, ज्यामुळे शरीराला पोषण मिळेल. विकतचे पदार्थ बनवताना पुन्हा पुन्हा वापरलेल्या तेलाचा वापर केला जातो. हे तेल शरीरासाठी अतिशय हानिकारक आहे. चला तर जाणून घेऊया पालक भजी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)