नेहमीचे कांदापोहे खाऊन कंटाळा आल्यास सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा पोह्यांचे चविष्ट कटलेट
रविवार म्हणजे सुट्टीचा वार. यादिवशी घरातील सर्व सदस्यांची सुट्टी असते. त्यामुळे नेहमीच सुट्टीच्या दिवशी नाश्त्यात काय बनवावं? हा प्रश्न सर्वच महिलांना पडतो. अशावेळी नाश्त्यात अनेक घरांमध्ये कांदापोहे, उपमा, शिरा किंवा इडली डोसा बनवला जातो. मात्र नेहमीच तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं होते. अशावेळी तुम्ही झटपट पोह्यांचे कटलेट बनवू शकता. पोह्यांचे कटलेट चवीला अतिशय सुंदर लागतात. घाईगडबडीच्या दिवशी लहान मुलांच्या डब्यात सुद्धा तुम्ही पोह्यांचे कटलेट देऊ शकता. सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता करणे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. चला तर जाणून घेऊया पोह्यांचे कटलेट बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
साधा, सोपा, झटपट नाश्ता! घरी बनवून पाहा Egg Burger; निवडक साहित्यांची गरज अन् 10 मिनिटांतच होतो तयार