Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजणी बनवण्याचे टेन्शन कायमचे जा विसरून! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा वाटीभर पोह्यांचे खमंग थालीपीठ

लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं थालीपीठ खायला खूप जास्त आवडते. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये पोह्यांचे थालीपीठ बनवू शकता. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 18, 2026 | 10:26 AM
भाजणी बनवण्याचे टेन्शन कायमचे जा विसरून! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा वाटीभर पोह्यांचे खमंग थालीपीठ

भाजणी बनवण्याचे टेन्शन कायमचे जा विसरून! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा वाटीभर पोह्यांचे खमंग थालीपीठ

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात सगळ्यांचं काहींना काही स्पेशल हवे असते. नाश्त्यात कायमच कांदापोहे, उपमा, शिरा किंवा पराठा खाल्ला जातो. पण नेहमीच तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही खाण्याची इच्छा होते. थालीपीठ खाण्याची इच्छा झाल्यानंतर बाजारातून विकतची थालीपीठ भाजणी आणून त्यापासून पदार्थ बनवला जातो. पण नेहमीच विकतची भाजणी आणून थालीपीठ बनवण्यापेक्षा वाटीभर पोह्यांचा वापर करून तुम्ही थालीपीठ बनवू शकता. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. नाश्त्यात नेहमीच कांदापोहे बनवून खाण्यापेक्षा पोह्यांपासून बनवलेले कुरकुरीत थालीपीठ खावे. कमीत कमी साहित्य आणि वेळात बनवलेला पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. पोह्यांचे खमंग थालीपीठ तुम्ही दही किंवा हिरव्या मिरचीच्या लोणच्यासोबत खाऊ शकता. यामुळे तुमचे पोट सुद्धा दीर्घकाळ भरलेले राहील आणि शरीराला सुद्धा फायदे होतील. चला तर जाणून घेऊया पोह्यांचे थालीपीठ बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

गुढीपाडवा सणाचा गोडवा वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये घरीच बनवा बदाम केशर श्रीखंड, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • पोहे
  • गव्हाचं पीठ
  • लाल तिखट
  • पांढरे तीळ
  • बेसन
  • हिरवी मिरची पेस्ट
  • मीठ
  • कोथिंबीर
  • कसुरी मेथी
  • धणे जिरं पावडर
  • हिंग
  • कसुरी मेथी
नेहमीच विकतचे आईस्क्रीम आणून खाण्यापेक्षा घरीच बनवा गारेगार मटका कुल्फी,कडाक्याच्या उन्हाळ्यात शरीराला मिळेल थंडावा

कृती:

  • पोह्यांचे थालीपीठ बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या वाटीमध्ये पोहे काहीवेळ भिजवून नंतर त्यातील पाणी गाळून काढून टाका.
  • त्यानंतर पोह्यांमध्ये गव्हाचं पीठ, बेसन, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची पेस्ट घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात धणे जिरं पावडर, लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ, हिंग आणि पांढरे तीळ घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • आवश्यकता वाटल्यास तयार केलेल्या मिश्रणावर थोडेसे पाणी शिंपडावे. यामुळे पीठ मऊ होईल.
  • तयार केलेल्या पिठाचा गोळा करून ओल्या रुमालावर थापून घ्या. त्यानंतर रुमाला सकट तयार केलेले थालीपीठ तव्यावर टाकून वरून पाणी लावून रुमाल काढून घ्या.
  • त्यानंतर थालीपिठाच्या बाजूने तेल किंवा तूप सोडून दोन्ही बाजूने कुरकुरीत भाजून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले वाटीभर पोह्यांचे थालीपीठ.

Web Title: How to make poha thalipeeth at home simple morning breakfast recipe poha recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 10:26 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

नागपंचमीच्या नैवेद्यासाठी बनवा मराठमोळे पारंपरिक पदार्थ! सणाचा आनंद होईल द्विगुणित
1

नागपंचमीच्या नैवेद्यासाठी बनवा मराठमोळे पारंपरिक पदार्थ! सणाचा आनंद होईल द्विगुणित

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव
2

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावा सुचत नाही? मग झटपट हेल्दी चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स, नोट करा रेसिपी
3

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावा सुचत नाही? मग झटपट हेल्दी चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स, नोट करा रेसिपी

चणा डाळ पटकन शिजवायचा असेल तर फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स! स्वयंपाकघरातील काम होतील झटपट
4

चणा डाळ पटकन शिजवायचा असेल तर फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स! स्वयंपाकघरातील काम होतील झटपट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.