गुढीपाडवा सणाचा गोडवा वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये घरीच बनवा बदाम केशर श्रीखंड
हिंदू नवीन वर्षात येणारा पहिला सण म्हणजे गुढीपाडवा. मोठ्या आनंदात आणि ढोल ताशांच्या गजरात मराठी सण साजरा केला जातो. घरात गुढी उभारून पूजा केली जाते. त्यानंतर गुढीला गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. मराठमोळ्या सणांच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य कायमच बनवला जातो. तर काही भागांमध्ये श्रीखंड पुरी बनवली जाते. घरात श्रीखंड तयार करणे अनेकांना वेळ खाऊ वाटते. पण नेहमीच बाजारात विकत मिळणारे श्रीखंड आणून खाण्यापेक्षा घरीच श्रीखंड बनवावे. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये बदाम केशर श्रीखंड बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले श्रीखंड दोन ते तीन दिवस व्यवस्थित टिकून राहील. सणावाराच्या दिवसांमध्ये दुधाचे पदार्थ बनवताना मोठ्या प्रमाणावर भेसळ केली जाते. त्यामुळे भेसळ युक्त पदार्थांचे सेवन करण्याऐवजी घरी बनवलेले श्रीखंड खावे. चला तर जाणून घेऊया बदाम केशर श्रीखंड बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)






