सकाळच्या नाश्त्यात खा स्वादिष्ट White sauce Broccoli pasta
थंडीच्या दिवसांमध्ये सकाळी लवकर जाग येत नाही. उठायला उशीर झाल्यानंतर सकाळच्या नाश्त्यात नेमकं काय बनवावं, सुचत नाही. कायमच कांदापोहे, उपमा, शिरा आणि इडली डोसा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही चमचमीत पदार्थ खाण्याची सगळ्यांचं इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये झटपट व्हाईट सॉस ब्रोकोली पास्ता बनवू शकता. लहान मुलं पास्ता आवडीने खातात. पण मुलांसह मोठ्यांना ब्रोकोली खायला अजिबात आवडत नाही. ब्रोकोलीचे नाव ऐकल्यानंतर तोंड वाकड करतात. त्यामुळे पास्ता बनवताना तुम्ही त्यात ब्रोकोली टाकल्यास चवीसोबत मुलांना शरीराला भरपूर पोषण मिळेल आणि आरोग्य सुधारण्यास मदत होईल. वर्क आऊट करून घरी आल्यानंतर अनेकांना हेल्दी पदार्थ खाण्यास हवे असतात. अशावेळी तुम्ही ब्रोकोली सॅलड किंवा शिजवलेली ब्रोकोली खाऊ शकता. यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहील. सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता करावा. पोट भरलेले असल्यास संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो. चला तर जाणून घेऊया व्हाईट सॉस ब्रोकोली पास्ता बनवण्याची सोपी रेसिपी. (फोटो सौजन्य – istock)
डब्यासाठी नेहमीच भाजी काय बनवावी सुचत नाही? मग राजस्थानी पद्धतीमध्ये झटपट बनवा ‘दही मिरची’






