आंबट गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास घरी झटपट बनवा कच्च्या कैरीची कँडी
उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर बाजारात कच्च्या कैऱ्या मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. कैरीचे नाव घेतल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. चवीला आंबटगोड असलेल्या कैरीपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. कैरीचे लोणचं, कैरीचा मुरंबा, कैरीची आमटी, कैरीची चटणी, कैरीचे सरबत इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कच्च्या कैरीपासून आंबटगोड कँडी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. बऱ्याचदा घरातील लहान मुलं सतत कोणते ना कोणते चॉकलेट खात असतात. पण वारंवार गोड पदार्थांचे सेवन केल्यामुळे दात दुखणे किंवा हिरड्यांना इजा होण्याची शक्यता असते. कच्च्या कैरीची कँडी चवीला अतिशय सुंदर लागते. उन्हाळ्यात शरीराला ऊर्जा देण्यासाठी आणि थंडावा कायम टिकवून ठेवण्यासाठी कैरीच्या कँडीचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया सोप्या पद्धतीमध्ये कैरीची कँडी बनवण्याची रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
सकाळच्या नाश्त्यात लहान मुलांसाठी बनवा पौष्टिक उकड्या तांदळाची पेज, आरोग्यासाठी ठरेल अतिशय प्रभावी