Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जेवणाची चव वाढवण्यासाठी कोकणातील पारंपरिक पद्धतीने बनवा आंबटगोड कैरीची आमटी, नोट करून घ्या रेसिपी

कच्च्या कैरीपासून विविध पदार्थ बनवले जातात. आज आम्ही तुम्हाला कोकणी पद्धतीमध्ये कच्च्या कैरीची आमटी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 31, 2026 | 08:00 AM
जेवणाची चव वाढवण्यासाठी कोकणातील पारंपरिक पद्धतीने बनवा आंबटगोड कैरीची आमटी, नोट करून घ्या रेसिपी

जेवणाची चव वाढवण्यासाठी कोकणातील पारंपरिक पद्धतीने बनवा आंबटगोड कैरीची आमटी, नोट करून घ्या रेसिपी

Follow Us
Follow Us:

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर शरीराला थंडाव्याची आवश्यकता असते. कारण वाढत्या उष्णतेचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसू लागतो. उन्हाळा सुरु झाल्यानंतर आहारात तिखट किंवा तेलकट पदार्थ अजिबात खाल्ले जात नाही. कारण तिखट पदार्थ खाल्ल्यानंतर शरीरात उष्णता वाढते आणि अपचनाच्या समस्या वाढू लागतात. त्यामुळे या दिवसांमध्ये आहारात आंबटगोड पदार्थ खावेत. त्यातील सगळ्यांच्या अतिशय आवडीचा पदार्थ म्हणजे कच्ची कैरी. कैरी पाहिल्यानंतर लगेच तोंडाला पाणी सुटते. कच्च्या कैरीपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला आंबटगोड चवीच्या कैरीपासून कोकणातील पारंपरिक पद्धतीने आमटी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ गरमागरम भात किंवा भाकरी, चपातीसोबत खूप सुंदर आणि चविष्ट लागतो. चला तर जाणून घेऊया आंबटगोड आमटी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

वाढत्या उन्हाळ्यात शरीरात टिकून राहील थंडावा! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा गुलकंद, गॅस अपचनाचा त्रास होईल नाहीसा

साहित्य:

  • कच्ची कैरी
  • ओल्या खोबऱ्याचा किस
  • आलं
  • लसूण
  • हिरव्या मिरच्या
  • लाल तिखट
  • लाल सुक्या मिरच्या
  • तांदळाचे पीठ
  • मोहरी
  • कढीपत्ता
  • हिंग
  • मेथी दाणे
  • गूळ
  • पाणी
  • तेल
लहान मुलांच्या डब्यात द्या पौष्टिक आणि टेस्टी इडली चाट, शाळेचा डबा होईल पूर्णपणे रिकामी

कृती:

  • आंबटगोड कैरीची आमटी बनवण्यासाठी सर्वप्रथम, कच्ची कैरी स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर कैरीची साल काढून किसून घ्या.
  • मिक्सरच्या भांड्यात ओल्या खोबऱ्याचा किस, हिरवी मिरची, लसूण पाकळ्या, लाल तिखट, काश्मिरी लाल तिखट, गरम मसाला, धणे आणि थोडस पाणी घालून मिक्सरमधून बारीक पेस्ट वाटून घ्या.
  • त्यानंतर तयार केलेल्या पेस्टमध्ये थोडस तांदळाचे पीठ घालून पुन्हा एकदा बारीक वाटून घ्या. यामुळे आमटीला घट्टपणा येईल.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात हिंग, मोहरी, मेथी दाणे आणि कढीपत्त्याची पाने घालून खमंग भाजा.
  • भाजलेल्या फोडणीमध्ये किसलेल्या कैरीचा किस घालून मिक्स करा आणि एक वाफ काढून शिजवा. त्यानंतर त्यात तयार केलेले वाटप टाकून मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ, आवश्यकतेनुसार कोमट पाणी आणि गूळ घालून आमटीला उकळी काढून घ्या.
  • कैरीच्या आमटीमध्ये शेवग्याच्या शेंगा सुद्धा टाकू शकता. यामुळे आमटीला सुंदर चव येईल.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली कैरीची आमटी. हा पदार्थ गरमागरम भातासोबत मस्त लागेल.

Web Title: How to make raw mango curry at home simple konkan style recipe raw mango recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • easy food recipes
  • food recipe
  • raw mango

संबंधित बातम्या

Tomato Rasam: दुपारच्या जेवणासाठी करा आंबट तिखट टोमॅटो रस्सम, घरातील प्रत्येक व्यक्ती आवडीने खाईल पदार्थ
1

Tomato Rasam: दुपारच्या जेवणासाठी करा आंबट तिखट टोमॅटो रस्सम, घरातील प्रत्येक व्यक्ती आवडीने खाईल पदार्थ

Recipe : लहान मुलांच्या टिफीनसाठी तयार करा चीज पराठा, टिफिन मिनिटांत होईल फिनिश
2

Recipe : लहान मुलांच्या टिफीनसाठी तयार करा चीज पराठा, टिफिन मिनिटांत होईल फिनिश

Tawa Pulao Recipe: सिक्रेट मसाल्याचा वापर करून घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्ट्रीट स्टाईल तवा पुलाव, सगळेच खातील आवडीने
3

Tawa Pulao Recipe: सिक्रेट मसाल्याचा वापर करून घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्ट्रीट स्टाईल तवा पुलाव, सगळेच खातील आवडीने

Kabab: चटपटीत, कुरकुरीत अन् स्वादिष्ट! संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट हरा-भरा कबाब; रेसिपी नोट करा
4

Kabab: चटपटीत, कुरकुरीत अन् स्वादिष्ट! संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट हरा-भरा कबाब; रेसिपी नोट करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.