Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लाल मिरच्यांपासून बनवा वर्षभर टिकणारे आंबट गोड लोणचं, कमीत कमी साहित्यामध्ये झटपट बनेल पदार्थ

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सर्वच घरांमध्ये लोणचं, पापड, फेण्या इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात.मात्र आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये लाल मिरचीचे लोणचं बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 01, 2025 | 10:54 AM
लाल मिरच्यांपासून बनवा वर्षभर टिकणारे आंबट गोड लोणचं

लाल मिरच्यांपासून बनवा वर्षभर टिकणारे आंबट गोड लोणचं

Follow Us
Close
Follow Us:

लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं लोणचं खायला खूप आवडते. लोणच्याचे सेवन जेवणात केल्यास जेवणात दोन घास जास्त जातात आणि लोणचं सुद्धा चवीला अतिशय सुंदर लागते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वेगवेगळ्या पदार्थांपासून लोणचं बनवलं जात. कैरीचे लोणचं, लिंबाचे लोणचं, आल्याचे लोणचं, लसूण लोणचं इत्यादी अनेक लोणच्याचे प्रकार बनवले जातात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये लाल मिरच्यांचे लोणचं बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. लाल मिरच्यांचा वापर मसाला बनवण्यासाठी केला जातो. मात्र असे नसून तुम्ही या मिरच्यांचा वापर करून वेगवेगळे पदार्थ बनवू शकता. जेवणात डाळ भात किंवा चपातीसोबत तुम्ही लोणचं खाऊ शकता. लोणचं बनवताना त्यात भरपूर तेलाचा वापर केला जातो. मात्र आम्ही तुम्हाला कमीत कमी तेलात लोणचं कसे बनवावे, याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – iStock)

उन्हाळा होईल आणखीनच स्पेशल! घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा मिक्स फळांचे फ्रूट कस्टर्ड, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • लाल मिरच्या
  • मीठ
  • तेल
  • हिंग
  • मोहरीच्या बिया
  • काळीमिरी
  • बडीशेप
  • ओवा
  • आमचूर पावडर
  • हळद
  • लाल तिखट
रात्रीच्या जेवणासाठी घरी बनवा गावराण स्टाईल आंबट-तिखट टोमॅटोचा सार; गरमागरम भातासोबत अप्रतिम लागेल

कृती:

  • लाल मिरच्यांचे लोणचं बनवण्यासाठी सर्वप्रथम, लाल मिरच्या स्वच्छ धुवून पुसून घ्या. त्यानंतर त्यांचे देठ काढून दोन तुकडे करा.
  • बिया काढून घेतलेल्या मिरच्या ५ ते ६ तास कडक उन्हात व्यवस्थित सुकवून घ्या.
  • तव्यामध्ये मोहरी, धणे, मेथीचे दाणे, बडीशेप, काळी मिरी आणि लाल मिरची सर्व मसाले वेगवेगळे भाजून घ्या. भाजून थंड केल्यानंतर बारीक पावडर तयार करा.
  • कढईमध्ये तिळाचे तेल गरम करून त्यात वाटून घेतलेले मसाले, आमचूर पावडर, हिंग, ओवा, कलौंजी, काश्मिरी लाल मिरची पावडर , हळद, मीठ आणि तीळ टाकून व्यवस्थित भाजा.
  • सुकवून घेतलेल्या बियांमध्ये तयार केलेला मसाला भरून तेलात मिरच्या ठेवा. त्यानंतर तयार करून घेतलेले मिरचीचे लोणचं
  • काचेच्या बरणीमध्ये भरून दोन दिवस उन्हात ठेवा. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले लाल मिरच्यांचे लोणचं.
 

Web Title: How to make red chili pickle at home simple food recipe summer special recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2025 | 10:54 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

शिल्लक राहिलेल्या इडलीला द्या मसालेदार ट्विस्ट! संध्याकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा मसाला इडली फ्राय, नोट करा रेसिपी
1

शिल्लक राहिलेल्या इडलीला द्या मसालेदार ट्विस्ट! संध्याकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा मसाला इडली फ्राय, नोट करा रेसिपी

खान्देश स्पेशल रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा झणझणीत कुरडईची भाजी, गरमागरम भाकरीसोबत लागेल चविष्ट
2

खान्देश स्पेशल रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा झणझणीत कुरडईची भाजी, गरमागरम भाकरीसोबत लागेल चविष्ट

सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा झणझणीत चवीचा टोमॅटो डोसा, लालचुटूक पदार्थाने करा दिवसाची सुरुवात
3

सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा झणझणीत चवीचा टोमॅटो डोसा, लालचुटूक पदार्थाने करा दिवसाची सुरुवात

Sweet Recipe: १० मिनिटांमध्ये घरीच बनवा चविष्ट रबडी मलाई टोस्ट, कधीच विसणार नाही पदार्थाची चव
4

Sweet Recipe: १० मिनिटांमध्ये घरीच बनवा चविष्ट रबडी मलाई टोस्ट, कधीच विसणार नाही पदार्थाची चव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.