सकाळच्या नाश्त्यात लहान मुलांसाठी बनवा पौष्टिक भाताची पेज
घाईगडबडीच्या दिवशी सकाळच्या नाश्त्यात नेहमीच काय बनवावं? असे अनेक प्रश्न महिलांना सतत पडतात. याशिवाय सर्वच लहान मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत. सुट्टीच्या दिवशी मुलं घरी असल्यानंतर त्यांना नाश्त्यात नेहमीच चमचमीत आणि चवदार पदार्थ खाण्यास हवे असतात. मात्र नेहमीच तेलकट किंवा तिखट पदार्थ खाल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. अशावेळी तुम्ही मुलांना उकड्या तांदळाची पेज बनवून देऊ शकतात. कोकणातील सर्वच गावांमध्ये सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर भूक लागल्यानंतर उकड्या तांदळाची पेज बनवली जाते. उकडे तांदूळ आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहेत. नेहमीच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर मुलांना पेज किंवा सूप असे हलके पदार्थ खाण्यास द्यावे. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला ऊर्जा मिळेल.(फोटो सौजन्य – iStock)
आजारी पडल्यानंतर किंवा भूक लागल्यानंतर बऱ्याच घरांमध्ये अजूनही पेज खाल्ली जाते. पेज खाल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. ताप किंवा सर्दी, खोकल्यामुळे शरीरातील कमी झालेली ऊर्जा वाढवण्यासाठी तांदळाच्या पेजेचे सेवन करावे. उकडे तांदूळ इतर तांदळांपेक्षा पचनास अतिशय हलके असतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये उकड्या तांदळाची पेज बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.