१० मिनिटांमध्ये घरच्या घरी बनवा 'खारे शेंगदाणे'
शेंगदाणे खाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहेत. शेंगदाण्याचा वापर जेवणातील पदार्थ बनवण्यासाठी सुद्धा केला जातो. मेथीची भाजी, चटणी किंवा इतर पदार्थ बनवताना शेंगदाण्याचा वापर केला जातो.दैनंदिन आहारात शेंगदाण्याचे सेवन केल्यामुळे शरीरातील लोहाची कमतरता दूर होण्यास मदत होते. त्यामुळे नियमित मूठभर शेंगदाणे आणि गुळाचे सेवन करावे. बऱ्याचदा भूक लागल्यानंतर किंवा टाईमपास म्हणून शेंगदाण्याचे सेवन केले जातात. भाजलेले खरे शेंगदाणे सगळ्यांचं खूप आवडतात. 5 किंवा 10 रुपयांच्या छोट्याशा पुदीमध्ये मिळणारे शेंगदाणे आवडीने खाल्ले जातात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये खारे शेंगदाणे बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या घरी बनवलेल्या शेंगदाण्याची चवसुद्धा अतिशय सुंदर लागते. चला तर जाणून घेऊया खारे शेंगदाणे बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी सकाळी उठल्यानंतर प्या ‘कोकम चीया सीड्स ज्युस’, पचनक्रिया राहील निरोगी
पीठ आंबवण्याची गरज नाही, सकाळच्या नाश्त्याला झटपट बनवा बेसनाचे अप्पे; 15 मिनिटांची रेसिपी