शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी सकाळी उठल्यानंतर प्या 'कोकम चीया सीड्स ज्युस'
निरोगी आरोग्य ठेवण्यासाठी शरीर हायड्रेट असणे आवश्यक आहे . अन्यथा शरीराची पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते. कामाचा तणाव, आहारात सतत होणारे बदल, अपुरी झोप, मद्यपान, शरीरातील पाण्याची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम पचनक्रियेवर लगेच दिसून येतो. पचनक्रिया बिघडल्यानंतर शरीरातील विषारी घटक आतड्यांमध्ये तसेच साचून राहतात, जे आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहे. यामुळे त्वचेवर पिंपल्स मुरूम येणे, त्वचा निस्तेज होणे, फॅटी लिव्हर इत्यादी अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे निरोगी आरोग्यासाठी सकाळी उठल्यानंतर शरीर हायड्रेट आणि स्वच्छ असणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी कोकम चिया सीड्स ज्युस बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पेयाचे सेवन केल्यास शरीर हायड्रेट आणि फ्रेश राहील. कोकमच्या रसाचे सेवन केल्यामुळे शरीरातील हानिकारक पदार्थ बाहेर पडून जातात. चला तर जाणून घेऊया कोकम चीया सीड्स ज्युस बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
विकतचे कशाला घरीच सोप्या पद्धतीने बनवा Chilli Cheese Noodles, फार सोपी आहे रेसिपी