रात्रीच्या जेवणासाठी गावरान पद्धतीमध्ये झटपट बनवा शेवची भाजी
दिवाळीच्या दिवसांमध्ये घरी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी कायमच बाहेरून विकत पदार्थ आणले जातात. पनीर टिक्का, मिक्स व्हेज किंवा कायमच तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं इच्छा होते. फराळ आणि मिठाईतील गोड पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. अशावेळी तुम्ही गावरान पद्धतीमध्ये शेव भाजी बनवू शकता. शेव भाजी तुम्ही चपाती, भाकरी किंवा गरमागरम भातासोबत सुद्धा खाऊ शकता. बऱ्याचदा ढाब्यावर जेवायला गेल्यानंतर शेव भाजी आणि तंदूर रोटी मागवली जाते. झणझणीत चवीची शेव भाजी लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. शेव भाजी बनवताना लाल रंगाच्या शेवचा वापर करावा. कारण ही शेव लगेच विरघळून जात नाही. चला तर जाणून घेऊया झणझणीत शेव भाजी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
चविष्ट अन् पौष्टिक; सकाळच्या नाश्त्याला बनवा हिरव्या मूगडाळीचा चिला