
पदार्थाच्या सुगंधाने सुटेल तोंडाला पाणी! थंडीत घरच्या घरी बनवा झणझणीत चवीचे लसूण लोणचं
भारतीय स्वयंपाक घरात कायमच लोणचं, चटणी आणि वेगवेगळे मसाले असतात. जेवणाची चव वाढवण्यासाठी ताटात लोणचं किंवा चटणी वाढली जाते. काहींना जेवणाच्या ताटात जर लोणचं नसेल तर जेवल्यासारखे वाटत नाही. तिखट चवीचे झणझणीत लोणचं तोंडाची चव वाढवते. कायमच तुम्ही कैरीचे लोणचं, लिंबू लोणचं, मिक्स भाज्यांचे लोणचं खालले असेल. पण आज आम्ही तुम्हाला लसूण लोणचं बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. लसूणचा वापर जेवणातील अनेक वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. लसूणची फोडणी डाळीची चव वाढते. याशिवाय सकाळी उठल्यानंतर नियमित एक लसूण पाकळी चावून खाल्ल्यास शरीरात जमा झालेले विषारी घटक बाहेर पडून जातील आणि आरोग्य सुधारेल. लसूण लोणचं दोन ते तीन महिने व्यवस्थित टिकून राहते. जेवणात नियमित एक किंवा दोन लसूण खाल्ल्यास आरोग्यासंबंधित कोणत्याही गंभीर आजाराची लागण होणार नाही. चला तर जाणून घेऊया लसूण लोणचं बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
पोषकतत्वांचा पावरहाऊस आहे ABCG Juice; शरीराला आतून करतो डिटॉक्स, घरी कसा बनवायचा ते जाणून घ्या