
नॉनव्हेज प्रेमींसाठी मेजवानी! रात्रीच्या जेवणात मालवणी पद्धतीमध्ये बनवा झणझणीत मसाला कोलंबी
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं मासे खायला खूप जास्त आवडतात. आठवड्यातील तीन वारांना मांसाहारी पदार्थ आवडीने खाल्ले जातात. पापलेट, बांगडा, कोळंबी, सुरमई मासे चवीसोबतच आरोग्यासाठी सुद्धा गुणकारी आहे. आपल्यातील अनेकांना कोळंबी हा प्रकार प्रचंड आवडतो. त्यापासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. कोळंबी भात, कोळंबी फ्राय, कोळंबी खिमा इत्यादी चविष्ट पदार्थ आवडीने खाल्लेले जातात. पण आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये मसाला कोळंबी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. मसाला कोळंबी गरमागरम भात, भाकरी किंवा चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता. रात्रीच्या जेवणात जर मांसाहारी पदार्थ असतील तर चार घास जेवण जास्त जात. पोट भरल्यासारखं वाटत. बाजारात स्वच्छ केलेली कोळंबी सहज उपलब्ध होते. त्यामुळे कोळंबी विकत आणून तिला मसाला लावून ठेवावे. यामुळे पदार्थाची चव वाढते. चला तर जाणून घेऊया मसाला कोळंबी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
Gobi Manchurian Recipe : फ्लॉवरचे कुरकुरीत मंचुरियन खाल्ले आहेत का? नोट करा रेसिपी