
सकाळच्या नाश्त्यात बनवा हिरव्यागार पालकाचे कुरकुरीत कटलेट
थंडीच्या दिवसांमध्ये सकाळी उठल्यानंतर खूप जास्त भूक लागते. नेहमीच नाश्त्यात कांदापोहे, उपमा, शिरा, इडली, डोसा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. नाश्त्यात खाल्लेल्या पौष्टीक पदार्थांमुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. घरात पालेभाज्या आणल्या मुलं भाज्या खाण्यास नकार देतात. पालेभाज्यांचे नाव ऐकल्यानंतर नाक मुरडतात. पण पालेभाज्या शरीरासाठी गुणकारी आहेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला हिरव्यागार पालकपासून कुरकुरीत कटलेट बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. पालक कटलेट चवीला अतिशय सुंदर लागतात. पालक खाल्ल्यामुळे शरीराला मुबलक प्रमाणात लोह मिळते. रक्ताची कमतरता निर्माण झाल्यानंतर पालक खाण्याचा सल्ला दिला जातो. पालक रस किंवा पालक स्मूदीचे रोजच्या आहारात नियमित सेवन केले जाते. यामध्ये आयर्न, कॅल्शियम, फायबर, मॅग्नेशियम, विटामिन आढळून येतात. चला तर जाणून घेऊया सोप्या पद्धतीमध्ये पालक कटलेट बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
वरण भातासोबत लागेल चविष्ट! १० मिनिटांमध्ये कडू कारल्यापासून बनवा झणझणीत ठेचा, नोट करून घ्या रेसिपी