उन्हाळ्यात पाहुण्यांच्या स्वागतासाठी सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा थंडगार Strawberry Mojito
उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर थंड पदार्थांचे सेवन केले जाते. त्यामध्ये फळे, भाज्या, ताक, दही, नारळ पाणी इत्यादी पदार्थांचे सेवन केले जाते. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी थंड पदार्थांचे सेवन करावे. उन्हाळ्यात शरीरामध्ये पाण्याची कमतरता निर्माण होते. पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर सतत अशक्तपणा, थकवा, चक्कर येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. अशावेळी लिंबू पाणी किंवा इतर पेयांचे सेवन केले जाते. मात्र आज आम्ही तुम्हाला उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घरी आलेल्या पाहुण्यांसाठी थंडगार स्ट्रॉबेरी मोजितो बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हॉटेलमध्ये गेल्यानंतर बऱ्याचदा मोजितो प्यायला जातो. मात्र किंमतीने महाग असलेले मोजितो पिण्यापेक्षा घरी सोप्या पद्धतीमध्ये मोजितो बनवावा. चला तर जाणून घेऊया स्ट्रॉबेरी मोजितो बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
लहान मुलांसाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा आंबटगोड चिंचेच्या गोळ्या, पदार्थ पाहून लहान मुलं होतील खुश
संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यानंतर काय खावं सुचत नाही? सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा फळांची चवदार भेळ