लहान मुलांसाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा आंबटगोड चिंचेच्या गोळ्या
लहान मुलांसह मोठ्यांना आंबटगोड चिंच खायला खूप आवडतात. चिंचेचे नाव ऐकल्यानंतर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. लहानपणी शाळेच्या बाहेर किंवा छोट्या मोठ्या दुकानांमध्ये चिंच किंवा चिंचेचे गोळ्या विकत मिळायच्या. या गोळ्या चवीला अतिशय सुंदर आणि आंबटगोड होत्या. मात्र हल्ली बदलेल्या जीवनशैलीमुळे आणि आहारातील पद्धतींमुळे अनेक गोष्टींबद्दल झाले आहेत. पूर्वीच्या कोणत्याही वस्तू दुकानांमध्ये पाहायला मिळत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला लहान मुलांसाठी आंबटगोड चिंचेच्या गोळ्या कशा बनवाव्या याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या गोळ्या लहान मुलं आवडीने खातील. चिंच थेट खाल्यास घसा किंवा आरोग्यासंबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे कोणत्याही वेळी चिंच खाण्याची इच्छा झाल्यास तुम्ही या पद्धतीमध्ये आंबटगोड चिंच गोळ्या बनवू शकता. चला तर जाणून घेऊया चिंच गोळ्या बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यानंतर काय खावं सुचत नाही? सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा फळांची चवदार भेळ