सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा फळांची चवदार भेळ
संध्याकाळच्या वेळी कामावरून थकून आल्यानंतर सगळ्यांचं भूक लागते. भूक लागल्यानंतर बऱ्याचदा चहा आणि बिस्किट खाल्ले जाते. मात्र मैद्याच्या बिस्किटांचे सतत सेवन करणे आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. यामुळे शरीराची पचनक्रिया बिघडू शकते. गॅस, ऍसिडिटी किंवा अपचनाची समस्या उद्भवून शरीराच्या कार्यात अडथळे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे संध्याकाळच्या वेळी लागली छोटीशी भूक भागवण्यासाठी नाश्त्यात हेल्दी आणि पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला संध्याकाळच्या वेळी लागलेली छोटीशी भूक भागवण्यासाठी फळांची चवदार भेळ बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. फळे खाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. यामध्ये असलेले विटामिन सी आणि इतर पोषक घटक आरोग्यासाठी अतिशय प्रभावी ठरतात. चला तर जाणून घेऊया फळांची भेळ बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
उन्हाळा होईल सुखकर! हापूस आंब्यांपासून घरच्या घरी बनवा थंडगार मँगो मस्तानी, नोट करून घ्या रेसिपी