Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Veg Spring Roll Recipe : स्ट्रीटसारखे कुरकुरीत ‘व्हेज स्प्रिंग रोल’ आता घरीच बनवा, पार्टी स्नॅक्ससाठी आहे परफेक्ट पर्याय

Chinese Dish : भाज्यांच्या स्टफिंगने भरलेले कुरकुरीत स्प्रिंग रोल तर सर्वांच्याच आवडीचे आहे. तुम्हाला माहितीये का? तुम्ही या पदार्थाला घरी देखील सहज तयार करु शकता. लहान मुलांना खुश करण्यासाठी ही एक परफेक्ट डिश आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: May 26, 2026 | 09:47 AM
Veg Spring Roll Recipe : स्ट्रीटसारख कुरकुरीत 'व्हेज स्प्रिंग रोल' आता घरीच बनवा, पार्टी स्नॅक्ससाठी आहे परफेक्ट पर्याय

Veg Spring Roll Recipe : स्ट्रीटसारख कुरकुरीत 'व्हेज स्प्रिंग रोल' आता घरीच बनवा, पार्टी स्नॅक्ससाठी आहे परफेक्ट पर्याय

Follow Us
Follow Us:
  • इंडो चायनीज पदार्थांचे चाहते तर देशात खूप आहेत.
  • यातीलच एक लोकप्रिय पदार्थ म्हणजे स्प्रिंग रोल.
  • तुम्ही घरीच या पदार्थाला तयार करु शकता.
चायनीज पदार्थांची आवड असणाऱ्यांसाठी व्हेज स्प्रिंग रोल हा एक अतिशय लोकप्रिय आणि स्वादिष्ट स्नॅक आहे. बाहेरून खुसखुशीत आणि आतून भाज्यांच्या मसालेदार सारणाने भरलेले हे स्प्रिंग रोल लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात. संध्याकाळच्या चहासोबत, पार्टी स्नॅक्स म्हणून किंवा मुलांच्या टिफिनसाठीही हा पदार्थ उत्तम पर्याय ठरतो. बाजारात मिळणाऱ्या स्प्रिंग रोलपेक्षा घरच्या घरी बनवलेले रोल अधिक ताजे, हेल्दी आणि चवदार लागतात.

Recipe : उडदाच्या डाळीपासून नाही तर बेसनापासून झटपट घरी बनवा कुरकुरीत पापड, वाळवण्याचीही गरज लागणार नाही

या रेसिपीत कोबी, गाजर, ढोबळी मिरची आणि इतर भाज्यांचा वापर केल्यामुळे हा पदार्थ पौष्टिकही बनतो. योग्य मसाल्यांचा समतोल आणि कुरकुरीत पोत यामुळे प्रत्येक घास खाण्याचा आनंद वाढतो. विशेष म्हणजे ही रेसिपी फार अवघड नाही. थोड्या संयमाने आणि योग्य पद्धतीने तुम्ही अगदी रेस्टॉरंट स्टाईल व्हेज स्प्रिंग रोल घरी सहज तयार करू शकता.

साहित्य

  • स्प्रिंग रोल शीट्स – 10
  • बारीक चिरलेला कोबी – 1 कप
  • किसलेले गाजर – 1/2 कप
  • बारीक चिरलेली ढोबळी मिरची – 1/2 कप
  • उकडलेले नूडल्स – 1 कप
  • आले-लसूण पेस्ट – 1 टीस्पून
  • सोया सॉस – 1 टेबलस्पून
  • चिली सॉस – 1 टेबलस्पून
  • मिरी पावडर – 1/2 टीस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • कॉर्नफ्लोअर – 2 टेबलस्पून
  • पाणी – आवश्यकतेनुसार
  • तेल – तळण्यासाठी
बोटं चाटत राहाल अशी चटकदार चव! संध्याकाळच्या जेवणात झटपट बनवा हॉटेल स्टाईल चविष्ट राजमा मसाला, नोट करा रेसिपी

कृती

  • कढईमध्ये थोडे तेल गरम करून त्यात आले-लसूण पेस्ट परता. त्यानंतर कोबी, गाजर आणि ढोबळी मिरची घालून मोठ्या आचेवर हलके परतून घ्या.
  • भाज्या किंचित मऊ झाल्यावर त्यात उकडलेले नूडल्स घाला. त्यावर सोया सॉस, चिली सॉस, मिरी पावडर आणि मीठ टाकून सर्व मिश्रण चांगले मिसळा.
  • हे तयार सारण पूर्णपणे थंड होण्यासाठी बाजूला ठेवा. गरम सारण भरल्यास रोल फाटू शकतात.
  • एका छोट्या वाटीत कॉर्नफ्लोअर आणि थोडे पाणी मिसळून घट्ट पेस्ट तयार करा. ही पेस्ट रोल चिकटवण्यासाठी वापरली जाईल.
  • स्प्रिंग रोल शीट घेऊन त्यात तयार सारण एका बाजूला ठेवा. आता शीट घट्ट गुंडाळत रोल तयार करा आणि कडा कॉर्नफ्लोअर पेस्टने बंद करा.
  • कढईमध्ये तेल गरम करा. तेल योग्य तापमानाला आल्यानंतर तयार रोल मध्यम आचेवर सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
  • गरमागरम व्हेज स्प्रिंग रोल टोमॅटो सॉस किंवा चिली सॉसबरोबर सर्व्ह करा. अधिक चविष्ट अनुभवासाठी त्यावर थोडेसे चाट मसाला शिंपडू शकता.

Web Title: How to make street style veg spring roll at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 09:45 AM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

घशात वाढलेल्या वेदनांमुळे हैराण झाला आहात? मग लाल भोपळ्यापासून बनवा गरमागरम पौष्टीक सूप, नोट करा रेसिपी
1

घशात वाढलेल्या वेदनांमुळे हैराण झाला आहात? मग लाल भोपळ्यापासून बनवा गरमागरम पौष्टीक सूप, नोट करा रेसिपी

Recipe : रविवार बनवा खास, संध्याकाळच्या नाश्त्याला ट्राय करा कुरकरीत ‘चिकन कटलेट’, रेसिपी आहे सोपी
2

Recipe : रविवार बनवा खास, संध्याकाळच्या नाश्त्याला ट्राय करा कुरकरीत ‘चिकन कटलेट’, रेसिपी आहे सोपी

पावसाळ्यात गरमागरम चपातीसोबत खाण्यासाठी राजस्थानी पद्धतीमध्ये बनवा दही पापडाची भाजी, लहान सुद्धा खातील आवडीने
3

पावसाळ्यात गरमागरम चपातीसोबत खाण्यासाठी राजस्थानी पद्धतीमध्ये बनवा दही पापडाची भाजी, लहान सुद्धा खातील आवडीने

Ashadhi Ekadashi 2026: उपवासाच्या दिवशी १० मिनिटांमध्ये दूध न आटवता बनवा मऊशार रबडी, नोट करा रेसिपी
4

Ashadhi Ekadashi 2026: उपवासाच्या दिवशी १० मिनिटांमध्ये दूध न आटवता बनवा मऊशार रबडी, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.