
घरी बनवा कुरकुरीत सुरणाचे काप
निरोगी आरोग्यासाठी आहारात अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांचे सेवन केले जाते. सुरणाच्या भाजीचे नाव ऐकल्यानंतर अनेक लोक नाक मुरडतात. सुरणाच्या भाजीला खाज असते, त्यामुळे बऱ्याच घरांमध्ये सुरण आणला जात नाही. मात्र सुरण खाल्यामुळे मूळव्याधीची समस्या दूर होते. मूळव्याधीच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा सुरणाच्या भाजीचे सेवन करावे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला डाळ भातासोबत खाण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये कुरकुरीत सुरणाचे काप बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. सुरणाचे काप घरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडतील. सुरणामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे शरीरात वाढलेली बद्धकोष्ठता आणि अपचनाची समस्या दूर होते. तसेच शरीरात वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी सुरण खावे. सुरणाची भाजी किंवा सुरण काप बनवताना भाजी आधी शिजवून घ्यावी. अन्यथा ऍलर्जी किंवा खाज येण्याची शक्यता असते. चला तर जाणून घेऊया सुरणाचे काप बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pintrest)
संध्याकाळचा नाश्ता थोडा चिजी होऊन जाऊद्यात; घरी बनवा सर्वांच्या आवडीचा Mac And Cheese
भाजी काय बनवावी सुचत नाही? ५ मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत कांद्याची चटणी, नोट करा रेसिपी