
रोज-रोज साधा पेरू खाऊन कंटाळा आला असेल तर झटपट बनवा थाई स्टाईल पेरुचे सॅलड
धावपळीच्या जीवनशैलीमुळे बऱ्याचदा शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे शरीराचे अनावश्यक वजन वाढू लागते. पोटावर चरबीचा थर जमा होऊन आरोग्य बिघडते. वाढलेले वजन, मधुमेह, उच्च कोलेस्ट्रॉल इत्यादी आजारांचा परिणाम शरीरावर झाल्यानंतर अनेक बदल दिसू लागतात.बऱ्याचदा वजन कमी करताना वेगवेगळ्या सप्लिमेंट्स, डाएट आणि उकडलेल्या भाज्या खाल्ल्या जातात. पण त्याच पांचट भाज्या खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही वेगळा पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही पेरूचे थाई स्टाईल सॅलड बनवून खाऊ शकता. थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात पेरू मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. पेरूमध्ये भरपूर विटामिन सी असते. याशिवाय फायबर युक्त पेरूचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि शरीरातील घाण बाहेर पडून जाते. फायबरयुक्त पदार्थ खाल्ल्यामुळे जास्त वेळ पोट भरलेले राहते. त्यामुळे वाढलेले वजन कमी करताना आहारात पेरू खावा. चला तर जाणून घेऊया थाई स्टाईल पेरूचे सॅलड बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)
Christmas 2025 : सणानिमित्त घरी बनवा टेस्टी सर्वांच्या आवडीचा ‘रेड वेल्व्हेट केक’, रेसिपी नोट करा