सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा तिरंगा सँडविच
देशभरात सगळीकडे मोठ्या आनंद आणि उत्साहात २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे. या दिवसाची आजपासून तयारी सुरु करण्यात आली आहे. शाळा, कॉलेज, सरकारी कार्यलय इत्यादी अनेक ठिकाणी धवजरोहणाच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. हा दिवस प्रत्येक भारतीय व्यक्तीसाठी खूप खास आहे. त्यामुळे हा दिवस आणखीन खास होण्यासाठी तुम्ही घरी सकाळच्या नाश्त्यात सोप्या पद्धतीमध्ये तिरंगा सँडविच बनवू शकता. हे सँडविच बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. सकाळच्या नाश्त्यात नेहमी नेहमी काय बनवावं? हा प्रश्न सर्वच महिलांना पडतो. अशावेळी बाजारातून विकत आणलेले किंवा पॅकिंग पदार्थ खाल्ले जातात. मात्र हे पदार्थ आरोग्यासाठी अतिशय घातक आहेत. तेलकट किंवा तिखट पदार्थांचे उपाशी पोटी सेवन केल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही घरी तिरंगा सँडविच बनवू शकता. जाणून घ्या रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा