Republic Day 2025: 26 जानेवारीला घरी बनवा तिरंग्याचे हे 5 पदार्थ, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच होतील खुश
देशभरात 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्याची तयारी मोठ्या जोरात आणि उत्साहात सुरू आहे. 26 जानेवारी हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा दिवस आहे. याच दिवशी ‘भारतीय संविधान’ देशभरात पूर्णपणे अंमलात आले, ज्यामुळे दरवर्षी हा दिवस भारतात थाटामाटात साजरा होतो. या दिवशी अनेकजण नवीन कपडे, देशाचा झेंडा अशा अनेक गोष्टींची खरेदी करत असतात. तसेच हा दिवस आणखीन खास करण्यासाठी आपल्या घरी गोडा-धोडाचे जेवण देखील तयार केले जाते.
तुम्हीही यावर्षीच्या प्रजासत्ताकदिनी काही खास आणि अनोखे बनवू इच्छित असाल तर आजच्या या रेसिपीज तुमच्या फार कामी येणार आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच पाच साध्या आणि चविष्ट पदार्थांबद्दल सांगत आहोत, जे तुम्ही घरी सहज बनवू शकता. मुख्य म्हणजे हे पदार्थ आपण तिरंगाच्या रंगाला अनुसरून बनवणार आहोत. हे तिरंग्याचे पदार्थ घरातील सर्वांनाच थक्क करतील. चला पाहुयात यांच्या रेसिपीज.
ट्री-कलर पोहे
पोहे हा एक अतिशय चवदार महाराष्ट्रीयन पदार्थ आहे, जो नाश्त्यामध्ये खूप लोकप्रिय आहे. पोहे अगदी सहज घरी तयार करता येतात आणि त्याला तिरंगा लुकही देता येतो. अशा परिस्थितीत हिरव्या रंगासाठी पालक वापरावा लागेल, तर भोपळ्यापासून भगवा रंग येईल. याशिवाय गाजर आणि सिमला मिरची वापरूनही तुम्ही तुमचे पोहे तीन रंगात भरू शकता.
ट्री-कलर ढोकळा
गुजरातची जान म्हटला जाणारा ढोकळा तिरंग्यातही तयार करता येतो. नाश्त्यातही याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. विशेष म्हणजे ढोकळा लहान मुलांबरोबरच मोठ्यांनाही खूप आवडतो. टिफिनमध्येही पाठवू शकता. ढोकळ्यावर तिरंगा आणण्यासाठी केशर पाणी आणि पालक प्युरी वापरता येईल. यासाठी तुम्हाला तीन रंगांचे ढोकळे तयार करून त्यांना एकत्र असेम्बल करावे लागेल.
ट्री-कलर सँडविच
सँडविच हा बनवायला सर्वात सोपा नाश्ता तर आहेच, पण तो टिफिनमध्येही घेता येतो. अशा स्थितीत तिरंग्यात सँडविचही तयार करता येतात. यासाठी पांढऱ्या ब्रेडपासून बनवलेल्या सँडविचच्या आत हिरवी चटणी आणि इतर भाज्यांसह गाजराचा थर लावा. या सँडविचचा कापून पाहताच त्यातून तिरंगा रंग दिसू लागेल.
गुळाचा चहा बनवताना दूध फाटते? मग भक्कड चहासाठी ही पद्धत फॉलो करा
ट्री-कलर पुलाव
हिवाळ्याच्या थंडीत गरमा गरम पुलाव खायला अनेकांना आवडते. अशा परिस्थितीत तुम्ही 26 जानेवारीला तिरंगा पुलावही तयार करू शकता. यासाठी तुम्ही हिरव्या रंगासाठी हिरवी चटणी आणि केशरी रंगासाठी टोमॅटो प्युरीचा वापर करू शकता. यासाठी पुलावला तीन वेगवेगळ्या रंगात तयार करा आणि एकत्र असेम्बल करा. चवीबरोबरच हा पुलाव दिसायलाही फार छान वाटेल.