Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेफ संजीव कपूर स्पेशल रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट उत्तपम सँडविच, सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी पदार्थ

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये उत्तपम सँडविच बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ घरातील प्रत्येकाला खूप जास्त आवडेल आणि पोट भरलेले राहील. सकाळच्या नाश्त्यात कायमच हेल्दी पदार्थ बनवावेत.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 27, 2026 | 10:30 AM
शेफ संजीव कपूर स्पेशल रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट उत्तमपम सँडविच, सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी पदार्थ

शेफ संजीव कपूर स्पेशल रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट उत्तमपम सँडविच, सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी पदार्थ

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात सगळ्यांचं काहींना काही टेस्टी आणि चमचमीत पदार्थ खाण्यास हवे असतात. कायमच उपमा, शिरा, कांदापोहे खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. भारतासह जगभरातील सर्वच देशांमध्ये दक्षिण भारतीय पदार्थ खूप फेमस आहेत. इडली, डोसा, सांबार, मेदुवडा इत्यादी वेगवेगळे पदार्थ खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. आज आम्ही तुम्हाला प्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांनी सांगितलेली उत्तपम सँडविच बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. शेफ संजीव कपूर त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून नवनवीन रेसिपी शेअर करत असतात. त्यांचा रेसिपी अतिशय सोप्या आणि कमीत कमी साहित्यात तयार होणाऱ्या आहेत. त्यामुळे सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्त्यात काहींना काही नवीन खायचे असल्यास तुम्ही उत्तपम सँडविच बनवू शकता. वेगवेगळ्या भाज्या, चीजचा वापर करून बनवलेला हा पदार्थ चवीला अतिशय टेस्टी लागतो. लहान मुलांच्या डब्यासाठी किंवा संध्याकाळच्या वेळी पाहुणे घरी आल्यानंतर त्यांच्या नाश्त्यात उत्तम सँडविच बनवून देणे उत्तम पर्याय आहे. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – AI)

Beetroot Chila Recipe : लालचुटूक बीटापासून घरी बनवा हेल्दी आणि टेस्टी चिला, पोषकतत्वांनी आहे भरपूर

साहित्य:

  • इडलीचे बॅटर
  • कांदा
  • टोमॅटो
  • शिमला मिरची
  • कोथिंबीर
  • लाल तिखट
  • हळद
  • तेल
  • चीज
  • गाजर
  • बीट
Traditional Maharashtrian Dal: ५ मिनिटांमध्ये पारंपरिक पद्धतीने बनवा तूरडाळीचे कोरडे वरण, गरमागरम भातासोबत लागेल भारी चव

कृती:

  • उत्तपम सँडविच बनवण्यासाठी सर्वप्रथम, गॅसवर पॅन गरम करण्यासाठी ठेवा. पॅन गरम झाल्यानंतर त्यावर तेल लावून घ्या आणि तयार केलेले डोसाचे मिश्रण गोलाकार पसरवा.
  • तयार केलेल्या डोसावर बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, किसलेले गाजर, बीट आणि कोथिंबीर घालून चमच्याने मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात लाल तिखट, हळद आणि चीज घालून मिश्रण व्यवस्थित मिक्स करा.
  • चीज पूर्णपणे वितळल्यानंतर त्यात पुन्हा एकदा वरून डोसाचे मिश्रण घालून दोन्ही बाजूने डोसा व्यवस्थित कुरकुरीत करून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला उत्तपम सँडविच. हा पदार्थ तुम्ही खोबऱ्याच्या किंवा टोमॅटो चटणीसोबत खाऊ शकता.

Web Title: How to make uttapam sandwich at home simple breakfast recipe sanjeev kapoor special recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2026 | 10:30 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

नागपंचमीच्या नैवेद्यासाठी बनवा मराठमोळे पारंपरिक पदार्थ! सणाचा आनंद होईल द्विगुणित
1

नागपंचमीच्या नैवेद्यासाठी बनवा मराठमोळे पारंपरिक पदार्थ! सणाचा आनंद होईल द्विगुणित

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव
2

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावा सुचत नाही? मग झटपट हेल्दी चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स, नोट करा रेसिपी
3

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावा सुचत नाही? मग झटपट हेल्दी चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स, नोट करा रेसिपी

चणा डाळ पटकन शिजवायचा असेल तर फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स! स्वयंपाकघरातील काम होतील झटपट
4

चणा डाळ पटकन शिजवायचा असेल तर फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स! स्वयंपाकघरातील काम होतील झटपट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.