साबुदाण्याचा वापर न करता १० मिनिटांमध्ये बनवा चविष्ट राजगिऱ्याची खीर
श्रावण महिन्यात मोठ्या प्रमाणावर उपवास केले जाते.भगवान शंकराची पूजा करून व्रत-वैकल्ये, पूजापाठ केले जातात. या महिन्यात केलेला उपवास धार्मिक आणि शारीरिक दृष्ट्या अतिशय लाभदायक ठरतो. श्रावण महिना सुरु झाल्यानंतर सर्वच घरांमध्ये शाहाकारी जेवण बनवले जाते. तसेच उपवासाच्या दिवशी साबुदाणा खिचडी किंवा साबुदाणा वडा बनवला जातो. मात्र नेहमीच साबुदाणे खाऊन कंटाळा अल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी तुम्ही उपवासाची खीर बनवू शकता. उपाशी पोटी साबुदाणे खाल्यामुळे अपचनाची समस्या वाढू लागते. त्यामुळे उपवास केल्यानंतर कायमच पचनास अतिशय हलके आणि दीर्घकाळ शरीरात ऊर्जा टिकवून ठेवणारे पदार्थ खावेत.चला तर जाणून घेऊया उपवासाची खीर बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pintrest)
लहान मुलांच्या डब्यासाठी झटपट बनवा भाजलेल्या शिमला मिरचीची चटणी, नोट करून घ्या पदार्थ