Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जेवणात तोंडी लावण्यासाठी तिखट पदार्थ हवा असेल तर लाल मिरच्यांपासून झटपट बनवा झणझणीत वऱ्हाडी ठेचा

दुपारच्या जेवणात बऱ्याचदा भाजी खाण्याचा कंटाळा येतो, अशावेळी तुम्ही झटपट वऱ्हाडी ठेचा बनवू शकता. चवीला तिखट लागणारा ठेचा भाकरीसोबत अतिशय सुंदर लागतो. जाणून घ्या ठेचा बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 15, 2025 | 10:59 AM
लाल मिरच्यांपासून झटपट बनवा झणझणीत वऱ्हाडी ठेचा

लाल मिरच्यांपासून झटपट बनवा झणझणीत वऱ्हाडी ठेचा

Follow Us
Follow Us:

जेवणाची चव वाढवण्यासाठी रोजच्या आहारात अनेक वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. कधी गोड पदार्थ खाल्ला जातो तर कधी आंबट तिखट लोणचं खाल्लं जात. मात्र नेहमीच हे पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही तिखट पदार्थ खाण्याची इच्छा होते. त्यात प्रामुख्याने खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे तिखट ठेचा. कोल्हापुरी चवीचा तिखट ठेचा सगळेचजण आवडीने खातात. अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं भाकरीसोबत ठेचा खायला खूप आवडतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला जेवणात तोंडी लावण्यासाठी लाल मिरच्यांपासून झणझणीत वऱ्हाडी ठेचा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा ठेचा अनेक तिखट पदार्थांचा वापर करून बनवला जातो. चला तर जाणून घेऊया वऱ्हाडी ठेचा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

फादर्स डे निमित्त लाडक्या वडिलांसाठी सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा क्रिमी बटरस्कॉच मूस, घरातील सग्ळ्यांनाही नक्कीच आवडेल

साहित्य:

  • लाल मिरच्या
  • लिंबाचा रस
  • लसूण
  • मीठ
  • आल्याचा तुकडा
  • जिरं
  • तेल
सकाळचा नाश्ता होईल स्पेशल! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चीज कॉर्न मॅगी, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • वऱ्हाडी ठेचा बनवण्यासाठी सर्वप्रथम, सुकलेल्या लाल मिरच्या स्वच्छ साफ करून पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर कपड्याने कोरड्या करा.
  • ठेचा बनवताना मिरच्या व्यवस्थित कोरड्या करून घ्या. मिरच्या व्यवस्थित न सुकल्यास ठेचा खराब होण्याची जास्त शक्यता असते.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात लाल मिरच्या भाजून घ्या. नंतर त्यात लसूण पाकळ्या घालून मिक्स करा.
  • गॅस बंद करून भाजून घेतलेले सर्व साहित्य थंड करा. मिक्सरच्या भांड्यात लाल मिरच्या आणि लसूण घालून बारीक करा.
  • त्यानंतर त्यात लिंबाचा रस आणि आल्याचा तुकडा घालून बारीक वाटून घ्या. सगळ्यात शेवटी जिरं घालून बारीक पेस्ट तयार करा.
  • तयार केलेला ठेचा वाटीमध्ये काढून त्यात चवीनुसार मीठ घालून मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला वऱ्हाडी ठेचा. हा ठेचा भाकरीसोबत अतिशय चविष्ट लागेल.

Web Title: How to make varhadi thecha at home simple food recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2025 | 10:59 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

नागपंचमीच्या नैवेद्यासाठी बनवा मराठमोळे पारंपरिक पदार्थ! सणाचा आनंद होईल द्विगुणित
1

नागपंचमीच्या नैवेद्यासाठी बनवा मराठमोळे पारंपरिक पदार्थ! सणाचा आनंद होईल द्विगुणित

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव
2

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावा सुचत नाही? मग झटपट हेल्दी चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स, नोट करा रेसिपी
3

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावा सुचत नाही? मग झटपट हेल्दी चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स, नोट करा रेसिपी

चणा डाळ पटकन शिजवायचा असेल तर फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स! स्वयंपाकघरातील काम होतील झटपट
4

चणा डाळ पटकन शिजवायचा असेल तर फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स! स्वयंपाकघरातील काम होतील झटपट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.