गणपती बाप्पाच्या नैवेद्यात मोदकांसोबत झटपट बनवा साजूक तुपातील अक्रोडचा हलवा
गणपती बाप्पाच्या आगमनामुळे सगळीकडे आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्वच घरांमध्ये बाप्पाच्या नैवेद्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवले जातात. गणपती बाप्पाच्या अतिशय आवडीचा पदार्थ म्हणजे उकडीचे मोदक. बाप्पाची आरती झाल्यानंतर प्रसादासाठी कायमच काहींना काही नवीन पदार्थ बनवले जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला साजूक तुपातील अक्रोड हलवा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. अक्रोड खाणे आरोग्यासाठी सुद्धा अतिशय गुणकारी आहे. गणपतीच्या दिवसांमध्ये घरात मोठी धावपळ असते. घाईगडबडीच्या वेळी कमीत कमी साहित्यामध्ये अक्रोड हलवा लगेच तयार होतो. चला तर जाणून घेऊया अक्रोड हलवा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)
सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा पौष्टिक नाचणीचा चिला, शरीरातील हाडे राहतील मजबूत