नो केमिकल, नो खर्च... काखेतील काळा थर क्षणात होईल दूर, फक्त या घरगुती पदार्थाचा वापर करा आणि कमाल बघा
काख काळवंडण्याची अनेक कारणे आहेत. मुळात, ही समस्या असेल तर याचा परिणाम आपल्या मानसिकतेवरही होऊ शकतो. आत्मविश्वास कमी होतो जर एखादा पोशाख आपल्याला आवडत असेल तर ते पोशाख परिधान करण्यास अडचणी निर्माण होतात. आपण शरीराचे इतकी काळजी घेऊनही अशा समस्या का निर्माण होतात? असा काही प्रश्न आपल्या मेंदूमध्ये घर करून जातो जेणेकरून आपल्याला सतत असमाधानतेची जाणीव होत असते. काख काळवंडली असेल तर त्यातून दुर्गंध येणे एक महत्त्वाची अडचण बनून जाते. तसेच त्यातून संसर्ग होण्याचा धोकाही फार असतो.
मुळात, काख काळवंडण्याची अनेक कारणे आहेत. जर तुम्हाला घट्ट कपडे परिधान करण्याची सवय असेल किंवा आवड असेल तर सावधान! कदाचित त्यामुळेच तुम्हाला ही समस्या होत असेल. पण कधी कधी डिओडोरंटच्या अतिवापरामुळे ही काखेला अशा समस्यांतून जावे लागते. यातील रसायने आपल्या त्वचेसाठी घातक ठरू शकतात. जर तुम्ही वारंवार वॅक्सिंग किंवा शेव्हिंग करत असाल तर त्याचाही वाईट परिणाम काखेवर होऊ शकतो. जर काख सतत झाकलेली असेल, योग्य हवा व प्रकाश मिळत नसेल तर त्याचाही वाईट परिणाम काखेवर होतो. परिणामी काखेचा रंग काळवंडण्यास सुरुवात होते. जर तुम्ही या कारणांपैकी कोणती एखादी गोष्ट वारंवार करत असाल तर त्यावर आतापासूनच मर्यादा घालण्यास सुरुवात करा, जेणेकरून होणारा त्रास कमी होईल.
काख काळवंडने या समस्येला सुधारण्यासाठी बाजारात अनेक क्रीम्स किंवा ट्रिटमेंट उपलब्ध आहेत. पण यामध्ये रसायनाचा भरपूर वापर असल्याने त्याने त्वचेला त्रास होण्याची दाट शक्यता असते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हा उपाय काही कायमस्वरूपी नसतो. हा उपाय केल्यास त्वचा कोरडी होण्याची शक्यता दाट असते तसेच त्वचेवर जळजळही जाणवते. पण जर तुम्ही या त्रासातून जात असाल तर काळजी करण्याचे कारण नाही कारण असे काही घरगुती उपाय आहे जे तुमच्या त्वचेला त्रासही देणार नाही आणि सकारात्मक परिणाम ही दिसून येईल.
बेकिंग सोडा आणि गुलाबपाणी
बेकिंग सोडा आणि गुलाबपाणी यांचा उपयोग सौम्य स्क्रबसारखा करता येतो. या मिश्रणाने हलक्या हाताने मसाज केल्यास मृत पेशी दूर होतात आणि त्वचा उजळ, मऊशार बनते.
तुरटी
दुसरा उपाय म्हणजे तुरटीचा वापर. अंघोळीनंतर तुरटी पाण्यात भिजवून काखेत घासल्यास बॅक्टेरिया नष्ट होतात आणि काळेपणा कमी होतो. तुरटीमध्ये जंतुनाशक गुणधर्म असल्याने ती त्वचेसाठी सुरक्षित आहे.
मुलतानी माती आणि लिंबाचा रस
तिसऱ्या उपायात मुलतानी माती आणि लिंबाचा रस वापरावा. हे मिश्रण त्वचेला थंडावा देतं, अतिरिक्त तेल शोषून घेतं आणि लिंबाचे नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म त्वचा उजळण्यासाठी मदत करतात. यामुळे केवळ काळेपणा नाही तर पुरळही कमी होतात.
बटाट्याचा रस
चौथा घरगुती उपाय म्हणजे बटाट्याचा रस. बटाट्यामध्ये सौम्य ब्लीचिंग गुणधर्म असतात. अर्धा बटाटा किसून त्याचा रस काढून दररोज 10 मिनिटं काखेत लावल्यास संवेदनशील त्वचेलाही कोणताही त्रास न होता त्वचा उजळू लागते.
टी ट्री ऑइल
शेवटचा आणि महत्त्वाचा उपाय म्हणजे टी ट्री ऑइलचा स्प्रे. टी ट्री ऑइलमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असल्यामुळे दुर्गंधी आणि इन्फेक्शनपासून संरक्षण मिळतं. 5 थेंब टी ट्री ऑइल एका कप पाण्यात मिसळून स्प्रे बाटलीत भरावं आणि अंघोळीनंतर काखेत शिंपडावं. दररोज वापर केल्यास त्वचा स्वच्छ राहते आणि काळेपणात लक्षणीय फरक पडतो.
वरील उपाय जरी घरगुती असले तरी कोणत्याही उपाय आपल्या त्वचेसाठी करून घेण्यासाठी सर्वप्रथम स्किन स्पेशलिस्ट किंवा तुमच्या डॉक्टरांची परवानगी आणि सल्ला घेण्यात यावा. मगच, या घरगुती उपायांचा अवलंब करावा.
Friendship Day 2025 : शाळेपासून कॉलेजपर्यंत मुलींच्या मैत्रीमध्ये होणारे बदल…
काखेतील काळा थर रोखण्यासाठी काय करावं?
धारदार रेझर वापरा, शेव्हिंग क्रीम लावा आणि शेव्हिंग केल्यानंतर मॉइश्चरायझर लावा, घर्षण कमी करण्यासाठी सैल-फिटिंगवाले कपडे घाला.
काखेत काळा थर का जमतो?
हायपरपिग्मेंटेशन, शेव्हिंग, वॅक्सिंग आणि अगदी घट्ट कपडे यामुळे होणारे घर्षण आणि जळजळ, हार्मोनल बदल, फंगल इन्फेक्शन ही काही प्रमुख कारणे आहेत.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.