हातापायांवर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी 'हे' घरगुती उपाय ठरतील प्रभावी
सतत बदलणारे वातावरण, धूळ, माती, प्रदूषण इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम जसा आरोग्यावर दिसून येतो, तसाच परिणाम त्वचेवर सुद्धा दिसून येतो. त्वचा काळी पडणे, टॅनिंग वाढणे,पिंपल्स, मुरूम इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. सर्वच महिला चेहरा सुंदर दिसावा म्हणून सतत काहींना काही करत असतात. कधी स्किन केअर केले जाते तर कधी त्वचा अधिकच सुंदर दिसावी म्हणून फेशिअल आणि वेगवेगळ्या ट्रीटमेंट केल्या जातात. मात्र या ट्रीटमेंटचा प्रभावी जास्त वेळ त्वचेवर टिकून राहत नाही. चेहऱ्यासोबत संपूर्ण शरीरावरील त्वचेची काळजी घेणे गजरेचे आहे. बऱ्याचदा उन्हामुळे शरीरावर टॅनिंग वाढते. त्वचेवर टॅनिंग वाढल्यानंतर त्वचा अधिकच निस्तेज आणि रुक्ष दिसू लागते.(फोटो सौजन्य – istock)
लघवीवर नियंत्रण राखता येत नाही? मग या टिप्सचे पालन करा, तज्ज्ञांनी दिला सल्ला
शरीरावर असलेले केस काढल्यानंतर त्वचा उजळदार दिसू लागते, असे अनेकांना कायमच वाटते. पण असे नसून चुकीच्या पद्धतीने शरीरावरील केस काढल्यास त्वचा कोरडी पडण्याची जास्त शक्यता असते. त्वचा टॅन झाल्यानंतर वेगवेगळे बॉडी मास्क किंवा स्किन केअर प्रॉडक्ट वापरले जातात. पण आज आम्ही तुम्हाला घरगुती पदार्थांचा वापर करून त्वचेवर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी काही सोपे उपाय सांगणार आहोत. हे उपाय केल्यास संपूर्ण शरीरावरील त्वचा उजळदार आणि सुंदर दिसेल. याशिवाय त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल.
त्वचेवर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी घरगुती उपाय करावे. घरगुती उपाय केल्यामुळे त्वचा नैसर्गिकरित्या स्वच्छ आणि सुंदर वाटू लागते. यासाठी लिंबाच्या रसाचा वापर करावा. लिंबामध्ये सॅट्रिक अॅसिड चेहऱ्यावर वाढलेले काळे डाग कमी करण्यासाठी मदत करते. यासाठी लिंबाचा रस आणि मध एकत्र मिक्स करून संपूर्ण शरीरावर लावावे. त्यानंतर १० मिनिटं ठेवून त्वचा पाण्याने स्वच्छ धुवावी. आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा हा उपाय केल्यास त्वचा अतिशय सुंदर आणि चमकदार दिसेल.
मागील अनेक वर्षांपासून त्वचेची काळजी घेण्यासाठी बेसनाचा वापर केला जात आहे. वाटीमध्ये बेसन घेऊन त्यात कच्चे दूध,हळद मिक्स करा आणि संपूर्ण शरीरावर लावा. ५ ते १० मिनिट ठेवून नंतर त्वचा स्वच्छ करून घ्या. यामुळे चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग कमी होईल आणि त्वचा सुंदर चमकदार दिसू लागेल. हा उपाय आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा करावा.
‘या’ विटामिनच्या कमतरतेमुळे ओठांवर वाढू लागतो काळेपणा, गुलाबी ओठांचे सौंदर्य क्षणार्धात होईल नष्ट
हातापायांवर वाढलेले केस काढण्यासाठी लिंबाचा रस आणि साखरच स्क्रब तयार करावा. तयार केलेला स्क्रब केसांच्या विरुद्ध दिशेने लावून हलक्या हाताने चोळावे. यामुळे केस सहज निघून येईल आणि त्वचा स्वच्छ होईल. आठवड्यातून दोनदा स्क्रब लावल्यास त्वचा अतिशय गुळगुळीत होऊन चमकदार दिसेल. याशिवाय त्वचा टॅन होण्यामागे अनेक कारण आहेत. त्वचा कायमच स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी भरपूर पाणी आणि पोषक आहार घेणे आवश्यक आहे.