
भाजीत तेल जास्त झालंय? 'या' सोप्या ट्रिक्स वापरून मिनिटांत बाहेर काढा एक्स्ट्रा ऑईल
डोळ्यांखालील सुरकुत्यांमुळे त्रस्त आहात? ‘या’ सोप्या उपायांनी कमी करा सुरकुत्या; टाळा ‘या’ चुका!
बर्फाच्या तुकड्याची घ्या मदत
हा हॅक मागे सोशल मिडियावरही खूप जास्त व्हायरल झाला होता. खरंतर यामागे एक बेसिक सायन्स आहे. जर भाजीत चुकून तेल जास्त पडले असेल तर ते कमी करण्यासाठी किंवा तेल भाजीतून बाहेर काढण्यासाठी आपण बर्फाच्या तुकड्याची मदत घेऊ शकतो. यासाठी बर्फाचा मोठा तुकडा भाजीच्या वरच्या थरावर अलगद फिरवा आणि मग बर्फाला भांड्यातून बाहेर काढा. तुम्हाला दिसेल की, बर्फावर तेलाचा एक थर जमा झाला आहे. हा तेलाचा थर वेगळा करा आणि पुन्हा बर्फाचा तुकडा भाजीवर फिरवा. असे तुम्हाला ५-६ वेळा करायचे आहे ज्यानंतर भाजीतील अतिरिक्त सर्व तेल चुटकीसरशी बाहेर पडले.
ब्रेडचा वापर
हा हॅक एका स्पंजप्रमाणे काम करतो, म्हणजे काय तर… स्पंज ज्या प्रमाणे सर्व पाणी शोषूण घेण्याचे काम करतो. त्याचप्रमाणे ब्रेड देखील भाजीतील अतिरिक्त तेल शोषूण घेण्याचे काम करतो. यासाठी एक ब्रेडचा तुकडा अलगद भाजीवर ठेवा आणि हलका दाब द्या, याने भाजीवर साचलेलं सर्व अतिरिक्त तेल शोषूण निघेल.
टिश्यू पेपरचा वापर
भाजीत जर तेल जास्त पडले असेल तर हे तेल बाहेर काढण्याासाठी तुम्ही टिश्यू पेपरचाही वापर करु शकता. यासाठी एका टिश्यू पेपरला भाजीच्या भांड्यावर अलगद वर ठेवा आणि हलका दाब द्या. काही सेकंदाने जेव्हा तेल यावर साचेल तेव्हा हा टिश्यू पेपर बाहेर काढा. तेल बाहेर काढल्यानंतर भाजीला पुन्हा एकदा गरम करण्यास विसरु नका.
फ्रिजरमध्ये थंड करा
जर तुमच्याकडे पुरेसा वेळ असेल तर भाजीला गॅसवरुन काढून फ्रिजरमध्ये साधारण अर्धा तास ठेवा. यामुळे फ्रिजरच्या थंड हवेत तेलाचा एक जाडसर थर वर जमा होईल जो तुम्ही सहज वेगळा करु शकता. अर्धा तासाने भांडे बाहेर काढा, तेलाचा हा थर वेगळा करा आणि भाजीला पुन्हा गरम करुन त्याचा आस्वाद घ्या.