
आतड्यांमधील घाण एका झटक्यात होईल स्वच्छ! कोमट दुधात मिक्स करून प्या 'हा' खास पदार्थ, साचलेला शौच पडेल बाहेर
Constipation Remedies: दिवाळीच्या फराळातील सर्वच पदार्थ अतिशय आवडीने खाल्ले जातात. चकली, चिवडा, करंजी, लाडू, शंकरपाळे अशा विविध पदार्थांची मेजवानी दिवाळीला सणाला बनवली जाते. सणावारांच्या आनंदामध्ये खाण्यापिण्याच्या सवयींकडे दुर्लक्ष होते. तेलकट, तळलेले आणि कमी फायबर असलेले पदार्थ खाल्ल्यामुळे पचनसंस्थेवर परिणाम होतो. यामुळे पोट फुगणे, गॅस किंवा बद्धकोष्ठता इत्यादी लक्षणे दिसू लागतात. शरीरात बद्धकोष्ठता वाढल्यानंतर मलत्याग करताना अडचण येणे, शौचाला कडकपणा, पोट पूर्णपणे साफ न झाल्याची भावना निर्माण होणे इत्यादी वेगवेगळ्या समस्या उद्भवू लागतात. अपचन झाल्यानंतर मेडिकलमधील गोळ्यांचे किंवा कोणत्याही चुकीच्या औषधांचे सेवन करण्याऐवजी कोमट दुधात हा पदार्थ मिक्स करून प्यावा.(फोटो सौजन्य – istock)
बद्धकोष्ठतेचा त्रास जाणवत असेल तर रात्रीच्या वेळी कोमट दुधात तूप मिक्स करून प्यावे. तुपामध्ये असलेले स्निग्ध पदार्थ शरीरातील घाण बाहेर काढून टाकण्यासाठी मदत होते. पण बद्धकोष्ठता झाल्यानंतर कायमच कोमट दूध आणि तुपावर अवलंबून न राहता योग्य ते उपचार करावे. दूध पचन होत नसेल किंवा लॅक्टोजची असहिष्णुता असल्यास दुधाचे सेवन करणे टाळावे.
पचनसंस्था चांगली ठेवण्यासाठी आहारात दही आणि जवस बियांचे सेवन करावे. दैनंदिन आहारात फायबर आणि चांगल्या जिवाणूंना पोषक घटक असतात. दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात, तर जवस बियांमध्ये फायबर आढळून येतात. भाजलेल्या जवस बियांमध्ये फायबर युक्त घटक असतात. यामुळे मऊ होऊन जातो आणि आतड्यांची हालचाल सुलभ होण्यास मदत होते. जवस खाल्ल्यामुळे शरीराला पुरेसे पोषण मिळते.
आवळ्यामध्ये विटामिन सी आणि इतर पोषक घटक आढळून येतात. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर नियमित कोमट पाण्यात आवळ्याचा रस मिक्स करून प्यावा. यामुळे पचनाच्या समस्या कमी होतील. बद्धकोष्ठतेवर आवळ्याचा रस खूप जास्त प्रभावी ठरतो. आम्लपित्त किंवा पोटासंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आवळ्याचे सेवन करावे.
दैनंदिन आहारात फायबरयुक्त फळांचे सेवन करावे. फायबरमुळे आतड्यांमधील मल मऊ होतो आणि शरीरातील विषारी घटक सहज बाहेर पडून जातात. त्यामुळे आहारात पेरू, संत्री आणि नाशपाती यांसारख्या फळांचे सेवन करावे. शरीराला पोषण देण्यासाठी आणि शरीर कायमच हायड्रेट ठेवण्यासाठी पाणीदार फळांचे सेवन करणे फार आवश्यक आहे. फायबरचे प्रमाण अचानक वाढवण्याऐवजी आहारात हळूहळू फायबर असलेले पदार्थ खावेत. याशिवाय नियमित भरपूर पाण्याचे सेवन करावे. पाण्याच्या सेवनामुळे शरीरातील घाण बाहेर पडून जाण्यास मदत होते.
Ans: बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यासाठी आहारात पपई, पेरू, सफरचंद, ओट्स, हिरव्या भाज्या आणि फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करावा.
Ans: कोमट दुधात इसबगोल मिसळून प्यायल्याने मल मऊ होण्यास आणि आतड्यांची हालचाल सुधारण्यास मदत होऊ शकते. मात्र, इसबगोल पुरेशा पाण्यासोबत घेणे आवश्यक आहे.
Ans: सकाळी उठल्यानंतर एक ग्लास पाणी प्यावे, नियमित व्यायाम करावा आणि फायबरयुक्त नाश्ता करावा. शौचाची इच्छा दाबून ठेवू नये.