शिल्लक राहिलेल्या जास्वदींच्या फुलांचा वापर करून 'या' पद्धतीने बनवा नॅचरल हेअर कंडिशनर, केस होतील मुलायम आणि सॉफ्ट
Hair Care Tips: राज्यासह संपूर्ण देशभरात गणपती बाप्पाचे मोठ्या जलौषात स्वागत झाले आहे. बाप्पाच्या आगमनामुळे सगळीकडे आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. गणपती बाप्पाच्या पूजेसाठी आवर्जून जास्वदींच्या फुलांचा वापर केला जातो. लालचुकूट जास्वंदी बाप्पाला वाहिली जातात. पण ही फुले केवळ बाप्पाच्या पूजेसाठीच नाहीतर केसांसाठी सुद्धा खूप जास्त गुणकारी ठरतात. बऱ्याचदा पूजा झाल्यानंतर फुले शिल्लक राहून जातात. या फुलांचं नेमकं काय करावं बऱ्याचदा सुचत नाही. त्यामुळे शिल्लक राहिलेली फुले फेकून देण्याऐवजी केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी वापरावीत. आज आम्ही तुम्हाला जास्वदींच्या फुलांपासून नॅचरल कंडिशर बनवण्याची कृती सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेला कंडिशर केस मऊ ठेवण्यास मदत करेल.(फोटो सौजन्य – istock)
वातावरणात होणारे बदल, मानसिक तणाव, पोषक घटकांची कमतरता आणि वारंवार केमिकल हेअर केअरचा वापर केल्यामुळे केसांची गुणवत्ता खराब होऊन जाते. केस खूप जास्त कोरडे आणि डल होऊन जातात. याशिवाय केसांमध्ये कोंडा, केस गळणे, केस तुटणे इत्यादी समस्या वाढून केसांची वाढ थांबते. त्यामुळे केसांची गुणवत्ता सुधारण्यासाठी कायमच केमिकल प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी नैसर्गिक पदार्थांचा वापर करावा. यामुळे केस खूप जास्त मऊ आणि चमकदार दिसतात.
कंडिशर बनवण्यासाठी जास्वदींची फुले, मेथी दाणे, जास्वदींची पाने, अळशीच्या बिया आणि पाणी इतक्याच गोष्टींची आवश्यकता आहे. हे पदार्थ स्वयंपाक घरात सहज उपलब्ध होतात. कंडिशर बनवण्यासाठी सगळ्यात आधी जास्वदींची फुले आणि पाने पाण्याने २ ते ३ वेळा स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर वाटीमध्ये स्वच्छ केलेली फुले आणि पाने, मेथी दाणे, अळशीच्या बिया एकत्र भिजत ठेवा. रात्रभर भिजत ठेवल्यास फुलांचा अर्क पाण्यात उतरेल. दुसऱ्या दिवशी तयार केलेले मिश्रण हलक्या हाताने दाबून टोपात ओतून नंतर गॅसवर गरम करण्यासाठी ठेवा. ५ ते ७ मिनिटं मंद आचेवर पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करा.
तयार केलेले मिश्रण घट्टसर असतानाच गाळून घ्यावे. जास्वदींच्या फुलांपासून बनवलेले कंडिशर काचेच्या एअर टाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. यामुळे कंडिशर लवकर खराब होणार नाही. तयार केलेले कंडिशर केस शाम्पूने स्वच्छ करून झाल्यानंतर केसांवर लावून हलक्या हाताने मसाज करा आणि त्यानंतर २ मिनिटं ठेवून केस पुन्हा एकदा पाण्याने स्वच्छ करा. जास्वंदीच्या फुलांमध्ये अमिनो ॲसिड, अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे इत्यादी अनेक घटक आढळून येतात. ज्यामुळे केस नॅचरली स्मूथ आणि चमकदार दिसतात.
Ans: होय. जास्वंदीची फुले आणि पाने वापरून घरच्या घरी नैसर्गिक हेअर कंडिशनर किंवा हेअर पॅक तयार करता येतो. यामुळे केसांना कंडिशनिंग मिळून ते मऊ आणि व्यवस्थित दिसण्यास मदत होऊ शकते.
Ans: जास्वंदीचा वापर पारंपरिक केसांच्या निगेसाठी केला जातो. त्यातील वनस्पतीजन्य घटक केसांना मऊपणा आणि टाळूला मॉइश्चरायझेशन देण्यास मदत करू शकतात.
Ans: जास्वंदीचा कंडिशनिंगसाठी वापर केला जाऊ शकतो; मात्र केसगळतीचे वैद्यकीय कारण असल्यास केवळ घरगुती उपायाने ती थांबेलच असे नाही. सतत किंवा जास्त केसगळती असल्यास त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.






