Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sleeping Tips: तुम्हालाही रात्री झोपताना घोरण्याची सवय आहे का? मग ‘या’ सोप्या टिप्स करा फॉलो

Snoring Controlling Tips: तुम्ही देखील दुसऱ्यांच्या रात्री घोरण्याच्या समस्येमुळे त्रस्त आहात? मग या टिप्स नक्की शेअर करा. जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 01, 2026 | 08:18 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Follow Us:
  • झोपताना घोरण्याची सवय आहे का?
  • या सोप्या टिप्स करा फॉलो
  • घोरण्याची खरी कारणे
अनेकजण घोरणे ही समस्या नसून गाढ व शांत झोपेचे लक्षण आहे असे समजतात. यामुळे बहुतेकदा लोक या समस्येकडे दुर्लक्ष करतात. घोरणे ही केवळ सामान्य सवय नसून काही वेळा ती आरोग्याशी संबंधित समस्येचे लक्षणही असू शकते. विशेषतः रात्री झोपताना श्वसनमार्गात अडथळा निर्माण झाल्यास घोरण्याचा आवाज येतो. यामुळे केवळ व्यक्तीचीच नाही, तर जवळ झोपलेल्या लोकांचीही झोप खराब होऊ शकते. तज्ज्ञांच्या मते, चुकीची झोपण्याची पद्धत, वजन वाढणे, मद्यपान किंवा नाक बंद असणे यामुळे ही समस्या अधिक वाढते. मात्र, काही सोप्या सवयी बदलल्यास घोरणे कमी करण्यास मदत होऊ शकते. वैद्यकीय शास्त्रानुसार, आपण झोपेत असताना जेव्हा श्वसनमार्गाच्या वरच्या भागात हवेचा प्रवाह पुरेसा नसतो, तेव्हा तेथील स्नायू कंप पावू लागतात. या कंपनामुळे मोठा आवाज निर्माण होतो, ज्याला आपण घोरणे म्हणतो. घोरण्याच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी कोणते उपाय करावेत, जाणून घ्या.

Skin Care Tips: झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावा ‘ही’ एक गोष्ट, त्वचा दिसेल तरुण अन् तजेलदार

एका कुशीवर झोपा

जर तुम्हाला घोरणे टाळायचे असेल, तर नेहमी डाव्या किंवा उजव्या कुशीवर झोपण्याचा प्रयत्न करा, एका कुशीवर झोपल्यामुळे श्वसनमार्ग पूर्णपणे मोकळा राहण्यास मदत होते आणि व्यक्ती कमी घोरतो.

वजन नियंत्रणात ठेवा

अधिक वजनामुळे मानेभोवती चरबी वाढते आणि श्वसनमार्गावर दबाव येतो. त्यामुळे घोरण्याची समस्या गंभीर होऊ शकते. यासाठी नियमित व्यायाम आणि संतुलित आहाराचे सेवन करा.

झोपण्यापूर्वी वाफ घ्या

सर्दी किंवा अॅलर्जीमुळे नाक बंद असल्यास श्वास घेण्यास त्रास होतो आणि घोरणे वाढू शकते. त्यामुळे नाक स्वच्छ ठेवणे महत्त्वाचे आहे.

झोपताना डोके उंच ठेवा

झोपताना एका अतिरिक्त उशीच्या साहाय्याने आपले डोके सुमारे ४ इंच उंच करा. यामुळे श्वासमार्गात होणारा अडथळा टळतो.

शरीर हायड्रेटेड ठेवा

दिवसभरात ८ ते १० ग्लास पाणी प्या, कारण शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे नाक आणि घशातील कफ चिकट होऊन अडथळे निर्माण होऊ शकतात.

घोरण्याची खरी कारणे

  • चुकीच्या स्थितीत झोपणे – पाठीवर झोपल्यावर जिभेचे आणि घशाचे स्नायू मागे वाकतात, ज्यामुळे श्वासमार्ग अंशतः बंद होतो.
  • वाढते वजन – घशाभोवती आणि मानेभोवती अतिरिक्त चरबी जमा झाल्यामुळे श्वसनमार्ग अरुंद होतो आणि घोरण्याची समस्या उद्भवते.
  • नाकाच्या रचनेतील दोष – जसे की नाकाचे हाड वाकडे असणे किंवा नाकाच्या आत मांस वाढल्यामुळे हवेचा मार्ग बंद होतो, ज्यामुळे घोरण्याची समस्या निर्माण होते.
  • सर्दी – नाक बंद झाल्यामुळे, अॅलर्जी किंवा सर्दीमुळे व्यक्तीला तोंडाने श्वास घ्यावा लागतो, जे घोरण्याचे प्रमुख कारण बनते.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Papaya Health Facts: कच्ची पपई खाणे फायदेशीर की हानिकारक? आरोग्यावर काय परिणाम होतो?

Web Title: How to stop snoring naturally causes remedies and sleep tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 08:18 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • lifestyle news in marathi

संबंधित बातम्या

उन्हाळा असो वा पावसाळा, नारळ पाणी ठरेल गुणकारी! जाणून घ्या शरीराला होणारे आरोग्यदायी फायदे
1

उन्हाळा असो वा पावसाळा, नारळ पाणी ठरेल गुणकारी! जाणून घ्या शरीराला होणारे आरोग्यदायी फायदे

पावसाळ्यात सतत खोकला होऊन छातीत कफ साचून राहतो? मग ‘या’ पदार्थांचे सेवन केल्यास कफापासून मिळेल कायमची सुटका
2

पावसाळ्यात सतत खोकला होऊन छातीत कफ साचून राहतो? मग ‘या’ पदार्थांचे सेवन केल्यास कफापासून मिळेल कायमची सुटका

Health Update: तपासण्या वाढूनही स्तन कर्करोगाचा धोका कमी होईना! कामा रुग्णालयात तीन वर्षांत रुग्णसंख्येत ६८ टक्के वाढ
3

Health Update: तपासण्या वाढूनही स्तन कर्करोगाचा धोका कमी होईना! कामा रुग्णालयात तीन वर्षांत रुग्णसंख्येत ६८ टक्के वाढ

भूक लागल्यानंतर पोटातून गुडगुड आवाज का येतो? पचनसंस्थेतील ‘या’ बदलांचा शरीरावर दिसून येतो थेट परिणाम
4

भूक लागल्यानंतर पोटातून गुडगुड आवाज का येतो? पचनसंस्थेतील ‘या’ बदलांचा शरीरावर दिसून येतो थेट परिणाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.