
हिवाळ्याच्या दिवसांमध्ये ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी? दैनंदिन आहारात बदल केल्यास शरीर राहील हेल्दी
हिवाळा हा ऋतू आरोग्य संवर्धनासाठी पोषक असला तरी असतो. या ऋतूतील कोरडे हवामान, थंडी आणि तापमानातील बदल यांचा थेट परिणाम आरोग्यावर होतो. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांची रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत असते. त्यात वयोवृद्धांना अर्थरायईटिस, अस्थमा, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित सारखे आजार असतात. त्यामुळे अशा लोकांनी हिवाळ्यात आरोग्याची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – istock)
वाढत्या वयानुसार हँगओव्हरचा त्रास का वाढतो? संशोधनातून समोर आलं मूळ कारणं
जीवाणू आणि विषाणू कोरड्या हवामानात सक्रिय असल्याने सर्दी, खोकला, ताप आणि श्वसनाचे त्रास होऊ शकतात. थंडीमुळे सांधे कडक होतात. त्यामुळे ज्यांना संधिवाताचा त्रास आहे त्यांना अधिक त्रास जाणवतो. हिवाळ्यात सूर्यप्रकाशाअभावी व्हिटॅमिन डी शरीराला मिळत नाही, ज्यामुळे हाडे कमकुवत होतात. बाहेर कमी पडल्याने शारीरिक हालचाली कमी होतात. ज्यामुळे नैराश्य येत नाही. हिवाळ्यात तहान कमी लागते, ज्यामुळे डिहाड्रेशन होऊ शकते
थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे चालावेत. कोमट पाणी प्यावे, थंड पाणी पिऊ नये. फायबरयुक्त आहार घ्यावा. यात फळे, भाज्या, ओट्स खावेत, साखर, मीठ आणि फॅट्सयुक्त पदार्थ कमी खावेत,सूप, फळांचे रस प्यावा. तहान लागत नसली तरी पाणी प्यावे. सकाळी कोवळे ऊन घ्यावे.चालणे, योगा करू शकता. यासाठी डॉक्टरची मदत घेऊ शकता, घरातील सदस्यांशी बोलावे. एकटे राहू नये.हात स्वच्छ धुवावेत, जेणेकरून संक्रमण टाळता येईल. गरज असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने व्हिटॅमिन डी किंवा इतर आवश्यक सप्लिमेंटस घेऊ शकता.हिवाळा हा आरोग्य सुधारण्याचा उत्तम काळ आहे, योग्य काळजी घेतल्यास ज्येष्ठ नागरिक हा ऋतू निरोगी आणि आनंदात घालवू शकतात.
थंडीच्या दिवसांमध्ये रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ज्याचा परिणामामुळे कोणत्याही वयातील व्यक्तीला हार्ट अटॅक किंवा हार्ट स्ट्रोकचा धोका उद्भवू शकतो. त्यामुळे रक्तात वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आणि कायमच हेल्दी राहण्यासाठी सकाळी उठल्यानंतर कच्चा लसूण चावून खावा. लसूण चावून खाल्ल्यास हृदयाचे आरोग्य कायमच निरोगी राहील आणि शरीराला कोणत्याही गंभीर आजाराची लागण होणार नाही.