
हेअर स्पा करण्यासाठी हजारो रुपये खर्च करत असाल तर थांबा! शाम्पूमध्ये मिक्स करा 'ही' २ रुपयांची पावडर
लांबलचक, काळ्याभोर, सुंदर केसांसाठी सर्वच महिला सतत काहींना काही करत असतात. पण वातावरणात सतत होणारे बदल, प्रदूषण, उन्हाचा सततचा संपर्क, स्ट्रेटनिंग, कर्लिंग आणि वारंवार केमिकलयुक्त प्रॉडक्ट्सचा अतिवापर केल्यामुळे केसांची गुणवत्ता खराब होऊन जाते. केसांच्या समस्या वाढू लागल्यानंतर महिला वारंवार महागडे हेअर शाम्पू, सीरम तर काहीवेळा केसांच्या ट्रीटमेंट सुद्धा करून घेतात. पण याचा परिणाम फारकाळ केसांवर टिकून राहत नाही. केस कोरडे पडणे, केस गळणे, केसांमध्ये कोंडा तर काहीवेळा केसांच्या मुळांवर इन्फेक्शन वाढण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे केसांच्या वाढत्या समस्यांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपाय करणे फार आवश्यक आहे. केस कोरडे किंवा रुक्ष झाल्यानंतर ते पुन्हा एकदा मऊ आणि मुलायम करण्यासाठी हेअर स्पा करून घेतला जातो.(फोटो सौजन्य – istock)
प्रत्येक महिन्याला हेअर स्पा करून हजारो रुपये खर्च केले जातात. हेअर स्पा केल्यानंतर दोन ते तीन दिवस केस सुंदर आणि चमकदार होतात. पण पुन्हा एकदा केसांची गुणवत्ता होती तशीच होऊन जाते. त्यामुळे केसांची गुणवत्ता सुधरण्यासाठी नॅचरल पदार्थांचा वापर करावा. यामुळे केसांची नैसर्गिक चमक कायम टिकून राहते आणि केस चमकदार होतात. आज आम्ही तुम्हाला केसांची नैसर्गिक चमक वाढवण्यासाठी कोणत्या पदार्थाचा वापर करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. रफ, फ्रिझी आणि निस्तेज केसांना पोषण देण्यासाठी बाजारातील महागडे प्रॉडक्ट वापरण्याऐवजी घरगुती उपाय करावेत.
हेअर स्पा करण्यासाठी केस पाण्याने स्वच्छ करून घ्यावेत. केसांवर तेल किंवा कंडिशनर लावू नये. वाटीमध्ये तुमच्या केसांना सूट होईल असा शाम्पू घेऊन त्यात कॉफी टाकून मिक्स करा. तयार केलेल्या मिश्रणात पाणी किंवा कोरफड जेल घालून व्यवस्थित मिक्स करा. त्यानंतर त्यात खोबरेल तेल घाला. सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर केसांच्या मुळांपासून ते अगदी टोकांपर्यंत लावून हलक्या हाताने मसाज करा. मसाज केल्यामुळे टाळूवर वाढलेला इन्फेक्शन आणि कोंडा कमी होण्यास मदत होईल. २ ते ३ मिनिट मसाज करून झाल्यानंतर ५ ते १० मिनिटं असाच ठेवा. त्यानंतर थंड किंवा कोमट पाण्याने केस स्वच्छ करून घ्या. केस धुवताना कॉफी केसांमध्ये अजिबात ठेवू नका.
Fine Lines: कमी वयातच चेहऱ्यावर दिसताहेत सुरकुत्या? जाणून घ्या त्यामागची खरी कारणे
कॉफीचा मास्क आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा केसांवर लावू शकता. यामुळे केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल आणि केस सुंदर होतील. याशिवाय कॉफी पावडर पाण्यात मिक्स करून त्याची पेस्ट केसांच्या मुळांपासून टोकांपर्यंत सगळीकडे काहीवेळ लावून ठेवल्यास केसांना आवश्यक पोषण मिळेल. कॉफीमध्ये असलेले कॅफिन ल्पमधील रक्तभिसरण वाढवते आणि केसांची मूळ मजबूत करण्यास मदत करते. केस कोरडे किंवा निस्तेज झाल्यानंतर आठवड्यातून दोनदा केसांवर कोरफड जेल लावावे.
Ans: योग्य पद्धतीने केस आणि टाळूची स्वच्छता, मसाज आणि कंडिशनिंग केल्यास केस मऊ, स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यास मदत होऊ शकते. मात्र परिणाम वापरलेल्या घटकांवर आणि केसांच्या प्रकारावर अवलंबून असतात.
Ans: नाही. सर्वच घरगुती घटक किंवा पावडर शाम्पूमध्ये मिसळणे सुरक्षित असेलच असे नाही. नवीन घटक वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करावी आणि संवेदनशील त्वचा असल्यास त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Ans: सामान्यतः आठवड्यातून एकदा किंवा पंधरा दिवसांतून एकदा हेअर स्पा करणे पुरेसे असते. खूप वारंवार केल्यास काहींच्या केसांवर किंवा टाळूवर विपरीत परिणाम होऊ शकतो.