
हेअरफॉल थांबवण्यासाठी महागड्या प्रॉडक्टचा वापर करत असाल तर थांबा! 'या' पदार्थांमध्ये मिक्स करून लावा कांद्याचा रस
वातावरणात सतत होणारे बदल, ओलसरपणा आणि आर्द्रतेमुळे केसांमध्ये सतत घाम येतो. पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर कधी ऊन वारा तर कधी दमट वातावरण असल्यामुळे केस आणि त्वचा खूप जास्त चिकट, तेलकट होऊन जाते. यामुळे केसांची मूळ अतिशय कमकुवत होतात आणि केस गळण्यास सुरुवात होते. केस गळण्यास सुरुवात झाल्यानंतर महिला बाजारात उपलब्ध असलेले वेगवेगळे हेअर केअर शाम्पू, कंडिशनर, हेअर मास्क, केमिकल ट्रीटमेंट करून घेतात. फार याचा फारसा परिणाम केसांवर दिसून येत नाही. यामुळे केसांची वाढ होण्याऐवजी केस खूप जास्त प्रमाणात गळू लागतात. आज आम्ही तुम्हाला केस गळणे थांबवण्यासाठी कांद्याच्या रसात कोणते पदार्थ मिक्स करून लावावेत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे पदार्थ केसांना नैसर्गिक पोषण देण्यास मदत करतात.(फोटो सौजन्य – istock)
उकाड्यामुळे मांड्यांमध्ये जळजळ आणि पुरळ उठतेय? ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा कायमची सुटका
केस गळतीवरील अतिशय प्रभावी उपाय म्हणजे कांद्याचा रस. स्वयंपाक घरात कांद्याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. कांद्याच्या रसात असलेले सल्फर केसांना आवश्यक पोषण देते आणि केस गळण्यापासून थांबवते. याशिवाय कांद्याच्या रसात अँटी-ऑक्सिडंट्स युक्त घटक आढळून येतात, ज्यामुळे टाळूवरील रक्तभिसरण सुधारण्यास मदत होते. यामुळे केसांची बंद पडलेली छिद्र ओपन होऊन नवीन केस येण्यास मदत होते. केसांच्या मुळांना आतून ओलावा आणि पोषण देण्यासाठी कायमच महागड्या महागड्या प्रॉडक्टचा वापर करू नये.
कांद्याचा रस
खोबरेल तेल
लिंबाचा रस
कोंड्यामुळे टाळूवर चिकटपणा वाढला आहे? मग एक चमचा मुलतानी मातीचा ‘या’ पद्धतीने करा वापर
सर्वप्रथम, वाटीमध्ये कांद्याचा रस घेऊन त्यात खोबरेल तेल आणि लिंबाचा रस एकत्र करून मिक्स करा. तयार केलेले मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर कापसाच्या मदतीने केसांच्या मुळांवर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. मसाज केल्यामुळे टाळूवरील कोंडा कमी होण्यासोबतच रक्तभिसरण सुधारेल आणि तणाव कमी होईल. केसांच्या वाढीसाठी कांद्याचा रस खूप गुणकारी आहे. १ तास ठेवल्यानंतर केस पाण्याने स्वच्छ धुवून टाका. त्यानंतर कोणत्याही सौम्य शाम्पूने केस स्वच्छ धुवून टाका. हा उपाय आठवड्यातून एकदा किंवा दोनदा केल्यास महिनाभरात केस गळणे थांबेल आणि केसांच्या समस्यांपासून सुटका मिळेल.
Ans: कांद्याच्या रसाचा वापर केस आणि टाळूच्या काळजीसाठी केला जातो. काही मर्यादित संशोधनात त्याचा विशिष्ट प्रकारच्या केसगळतीवर फायदा दिसून आला आहे; मात्र सर्व प्रकारच्या हेअरफॉलवर तो प्रभावी ठरेलच असे नाही.
Ans: कांद्याचा रस वापरताना कोरफड जेल किंवा खोबरेल तेलासारखे घटक मिसळण्याचा पर्याय काही लोक वापरतात. मात्र टाळूच्या प्रकारानुसार परिणाम वेगळा असू शकतो.
Ans: पहिल्यांदा वापरत असल्यास कमी वेळ ठेवून टाळूची प्रतिक्रिया पाहावी. जळजळ किंवा खाज जाणवल्यास लगेच स्वच्छ पाण्याने धुवून टाकावे.