अंघोळ करताना नियमित शरीराला साबण लावता असाल तर थांबा! त्वचेसंबंधित उद्भवू शकतात 'या' गंभीर समस्या
वर्षाच्या बाराही महिने अंघोळ करताना साबण वापरला जातो. दिवसभर घामामुळे चिकट झालेले अंग स्वच्छ करण्यासाठी साबण वापरला जातो. बाजारात अनेक वेगवेगळ्या ब्रँडचे साबण उपलब्ध आहेत. पण हानिकारक केमिकल आणि रसायनांचा वापर करून बनवलेले साबण तात्पुरती शरीराची स्वच्छता करतात. मात्र पुन्हा एकदा घामामुळे अंग चिकट होऊन घाणीचा थर साचून राहतो. अंघोळ करताना लावलेल्या साबणामुळे शरीर स्वच्छ होते, असे सगळ्यांचे वाटत. पण असे नसून साबण लावल्यामुळे त्वचेला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. त्वचेमधील ओलावा नष्ट होऊन त्वचा अतिशय कोरडी आणि निस्तेज होऊन जाते. त्यामुळे अंघोळ करताना साबणाचा वापर करू नये.(फोटो सौजन्य – istock)
अंघोळ करताना थंड की गरम पाणी वापरावे? जाणून घ्या शरीरासाठी कोणते पाणी आहे जास्त प्रभावी
अनेक महिला अंघोळ करताना जेण्ट्ल बॉडी वॉश किंवा वेगवेगळ्या पदार्थांपासून बनवलेल्या साबणाचा वापर करतात . मात्र या साबणाचा वापर केल्यामुळे त्वचा काहीवेळापुरती अतिशय सुंदर आणि चमकदार वाटू लागते. बाजारात शरीरावर वाढलेली डेड स्किन कमी करण्यासाठी अनेक वेगवेगळे साबण उपलब्ध आहेत. मात्र या साबणाचा अजिबात वापर करू नये. चला तर जाणून घेऊया त्वचेची काळजी घेताना साबण किती वेळा वापरावा आणि साबण कधी लावावा? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
अंघोळ करताना अंगाला दररोज साबण लावू नये. यामुळे त्वचेमध्ये असलेले नैसर्गिक तेल आणि ओलावा कमी होऊन जातो. ज्यामुळे तुमची त्वचा खूप जास्त ड्राय आणि सुकल्यासारखी वाटू लागते. शरीर स्वच्छ करण्यासाठी केमिकलयुक्त हानिकारक साबणांनाच वापर न करता घरगुती पदार्थांपासून बनवलेल्या साबणांचा वापर करावा. यामुळे त्वचा अधिकच सुंदर राहील. केमिकल रसायनांचा वापर करून बनवलेले साबण त्वचेमधील तेल नष्ट करून टाकतात. यामुळे त्वचा अतिशय कोरडी आणि निस्तेज दिसते.
फुफ्फुस आणि लिव्हरमधील सडलेली घाण 5 दिवसात होईल साफ, सकाळी प्या केवळ घरातील ‘हे’ काळे पाणी
तुमची त्वचा अतिशय सेन्सेटिव्ह असेल तर साबण अजिबात लावू नये. यामुळे तुमच्या त्वचेवर इन्फेक्शन वाढण्याची शक्यता असते. तसेच तुम्ही आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा साबणाचा वापर करू शकता. जर तुम्ही दोन किंवा तीन वेळा साबण वापरत असाल तर तुमची त्वचा कोरडी होणार नाही. पण नेहमीच साबण लावल्यामुळे त्वचेवर काहीवेळा रॅश येण्याची जास्त शक्यता असते. सकाळच्या वेळी अंघोळीसाठी थंड पाणी वापरावे, गरम पाण्याचा वापर करू नये. यामुळे त्वचेमधील आर्द्रता कमी होऊन त्वचा कोरडी पडून जाते.