
एका रात्री चेहऱ्यावर येईल काचेसारखी चमक! चमचाभर जवस बियांचा 'या' पद्धतीने करा वापर
सुंदर दिसण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी स्किन केअरमध्ये बदल तर कधी फेशिअल, क्लीनअप करून चेहऱ्यावरील पिंपल्स आणि डाग घालवले जातात. त्वचेची काळजी घेण्यासाठी कायमच महिला बाजारात उपलब्ध असलेल्या कोरियन स्किनचा वापर करतात. यामुळे त्वचेवर काचेसारखी चमक येते. पण हा चमक काही काळापुरतीच त्वचेवर टिकून राहते आणि कालांतराने पुन्हा एकदा त्वचा होती तशीच होऊन जाते. वारंवार स्किन केअर प्रॉडक्टमध्ये बदल केल्यास त्वचेचे नुकसान होऊ शकते. कारण कायमच महागडे प्रॉडक्ट त्वचेसाठी प्रभावी ठरत नाही. वातावरणात होणाऱ्या बदलांचा परिणाम चेहऱ्यावर दिसू लागल्यानंतर त्वचा खूप जास्त चिकट आणि तेलकट होते. चेहऱ्यावर जमा झालेल्या अतिरिक्त तेलामुळे त्वचेवर पिंपल्स आणि मुरुमांचे बारीक फोड येतात.(फोटो सौजन्य – istock)
चेहऱ्यावर आलेले पिंपल्स आणि मुरुमांचे डाग घालवण्यासाठी महिला खूप जास्त मेकअप करतात. पण मेकअप केल्यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स किंवा डाग कमी होत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी आणि काचेसारखी चमकदार त्वचा करण्यासाठी जवस बियांचा कशा पद्धतीने वापर करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. जवस बियांचे नियमित सेवन केल्यास त्वचेमध्ये अनेक फरक दिसून येतील. या बियांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळून येते, ज्यामुळे त्वचा अतिशय तेजस्वी होते. जाणून घ्या सविस्तर.
कोरियन स्किन केअर प्रॉडक्टमध्ये तांदळाच्या पाण्याचा आणि जवस बियांचा वापर केला जातो. जवस बिया चेहऱ्यावरील काळे डाग घालवण्यासाठी मदत करते. यासाठी मिक्सरच्या भांड्यात एक किंवा दोन चमचे जवस बिया घेऊन बारीक वाटून घ्या. पावडर तयार करून झाल्यानंतर एअर टाईट कंटेनरमध्ये भरून ठेवा. यामुळे पावडर जास्त वेळ टिकून राहील. टोपात एक ग्लास पाणी घेऊन ते गरम करण्यासाठी ठेवा. पाण्याला एक उकळी आल्यानंतर त्यात जवस बियांची पावडर आणि तांदळाचे पीठ घालून पेस्ट तयार करा. हळूहळू मिश्रण घट्ट झाल्यानंतर गॅस बंद करून घ्या.
हिवाळ्यात भासणार नाही महागड्या स्किन केअर प्रॉडक्टची गरज, ‘या’ पद्धतीने चेहऱ्यावर लावा कोरफड जेल
तयार केलेले मिश्रण गरम असताना गाळून घ्या. त्यानंतर कोमट झाल्यानंतर जवसाचे मिश्रण चेहऱ्यावर लावून अर्धा तास ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने त्वचा स्वच्छ धुवून घ्या. हा फेसपॅक आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा चेहऱ्यावर लावल्यास त्वचेच्या बऱ्याच समस्यांपासून आराम मिळेल आणि त्वचा अतिशय सुंदर दिसेल. कोणताही फेसपॅक चेहऱ्यावर लावून झाल्यानंतर मॉईश्चरायजर लावणे आवश्यक आहे. अन्यथा त्वचा खूप जास्त कोरडी होऊ शकते.