हिवाळ्यात भासणार नाही महागड्या स्किन केअर प्रॉडक्टची गरज, 'या' पद्धतीने चेहऱ्यावर लावा कोरफड जेल
थंडीच्या दिवसांमध्ये त्वचेवर वाढलेला काळेपणा कमी करण्यासाठी कोरफड जेलचा वापर करावा. यामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स, अँटी-इन्फ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल घटक त्वचा निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात. यामुळे त्वचेची डेड स्किन निघून जाते आणि त्वचा सुंदर होते. त्वचा मॉइश्चरायझिंग आणि हायड्रेट ठेवण्यासाठी कोरफड जेल गुणकारी ठरते. वातावरणातील बदलांमुळे रक्ताभिसरणात अनेक अडथळे निर्माण होतात. अशावेळी फेस योगा किंवा फेस मसाज करावा. यामुळे त्वचेला भरमसाट फायदे होतात. आज आम्ही तुम्हाला कोरफड जेलचा वापर कशा पद्धतीने करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
त्वचेला कोरफड जेल लावण्याआधी त्यात गुलाब पाणी मिक्स करून लावावे. यामुळे त्वचा हायड्रेट राहते. कारण गुलाब पाण्यात असलेल्या गुणधर्मांमुळे त्वचा अधिकच फ्रेश दिसते. त्वचा मुलायम, फ्रेश आणि सतेज ठेवण्यासाठी कोरफड जेलमध्ये गुलाबपाणी मिक्स करून लावावे. यामुळे थंडीत ड्राय झालेली त्वचा सुधारण्यासाठी नियमित कोरफड जेल लावावे. यामध्ये असलेल्या अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्मांमुळे त्वचेला आलेली सूज, जळजळ आणि लालसरपणा कमी होण्यास मदत होते. चेहऱ्यावर आलेले मोठे मोठे पिंपल्स, फोड आणि मुरूम कमी करण्यासाठी कोरफड जेलचा वापर करावा. कोरफड जेलमुळे त्वचेवरील डेड स्किन सहज निघून जाते आणि त्वचा सुंदर होते.






